Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

मंत्रालयात विषप्राशन करणाऱ्या शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन

मुंबई - जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी न्यायाची मागणी करत विषप्राशन करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे रविवारी रात्री निधन झाले. संपादित जमिनीच्या योग्य मोबदल्यासाठी गेली अनेक दिवस मंत्रालयात चकरा मारल्या पण तरीही योग्य दाद मिळत नसल्याने हतबल धर्मा पाटील यांनी २२ जानेवारीला मंत्रालयातच विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दरम्यान, आपल्याला न्याय मिळेपर्यंत आपण वडिलांचा मृतदेह हलवणार नाही असे धर्मा पाटील यांच्या मुलांनी सांगितले आहे. 

धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात धर्मा पाटील यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. चार एकर शेतात ६०० आंब्याची झाड लागवड केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. शेतात विहीरदेखील आहे. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना फक्त चार लाख रुपये भरपाई देण्यात आली. धर्मा पाटील यांच्या पाच एकर जमिनीच्या मोबदल्यात केवळ चार लाखाचा मोबदला औष्णिक वीज प्रकल्पासाठी वीज निर्मिती करणाऱ्या यंत्रणेने देऊ केला. मात्र हा मोबदला योग्य नसल्यानं वीज प्रकल्पासाठी जमीन संपादित करणा-या यंत्रणेकडून दुजाभाव झाल्याचा आरोप करीत धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील ८० वर्षीय धर्मा पाटील यांनी गेल्या सोमवारी मंत्रालयात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर मुंबईत सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. धर्मा पाटील यांच्या या प्रकल्पासाठी ५२९ हेक्टर जमीन संपादित करण्यात आलीय. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला. मात्र त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य न्याय मिळत नसल्याने विषप्राशन केले होते. अखेर उपचार सुरू असताना रविवारी रात्री त्यांचे निधन झाले. उपचार घेत असलेल्या धर्मा पाटील यांना धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल वगळता कुणीही भेटण्यासाठी गेलेलं नाही, किंवा त्यांची साधी विचारपूसही करण्यात आलेली नाही, असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom