Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

रेल्वे प्रवासी संघटनेद्वारे दिवा स्टेशनवर स्वच्छता मोहीम


मुंबई । प्रतिनिधी - स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत मध्य रेल्वेच्या दिवा स्टेशनवर दिवा रेल्वे प्रवासी संघटनेद्वारे रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नववर्षाची सुरुवात म्हणून प्रत्येक जण नवीन संकल्प करत असतो. असाच एक संकल्प दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने करण्यात आला. आपण रोज रेल्वे प्रवास करतो. रेल्वे आपली जीवन वाहिनी आहे. रोजचे आपण किमान ३ ते ४ तास प्रवासात घालवतो. त्यावेळी स्टेशनवर किंवा रेल्वेमध्ये आपल्याला कचरा दिसतो. त्यामुळे आपल्याला रोगराई होऊ शकते. म्हणून ही स्वच्छता अभियानाची संकल्पना डोळ्यासमोर ठेवून राबविण्यात आली.

या स्वच्छता अभियानाचे उदघाटन मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष मधू कोत्तीयन यांच्या हस्ते करण्यात आले. तर या अभियानाला भाजपा दिव्याचे सरचिटणीस रोहिदास मुंडे व सचिन भोईर ही उपस्थित होते. या स्वच्छता अभियानात १५० रेल्वे प्रवासी सहभागी झाले होते. त्यांनी दिवा रेल्वे स्टेशनचे दोन पादचारी पूल, फलाट क्रमांक १ ते ८ यांची सफाई केली. तसेच दिवा स्टेशनच्या पश्चिमेला असलेल्या तिकीट घराचीही सफाई करण्यात आली. या मोहिमेत अंदाजे २०० किलो कचरा जमा झाला. या मोहिमेत दिवा कोल्हापूर जिल्हा रहवाशी संघ, कोकण मराठा संघ, दिवा संघ, दिवा स्टेशन आरपीएफ, जीआरपी पोलीस व दिवा स्टेशनचे कर्मचारी ही सामील झाले होते. हे स्वछता अभियान दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आदेश भगत व संघटनेचे पदाधिकारी याच्या सहकार्याने संपन्न झाले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom