Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

धार्मिक स्थळे आणि शाळांजवळ फेरीवाल्यांना जागा


नागरिकांच्या सूचनांनंतरच अंतीम निर्णय़ -
मुंबई । प्रतिनिधी - मुंबईत रेल्वे स्थानकासह रुग्णालय, शाळा, मंदिर आदीं गर्दीच्या ठिकाणापासून १०० मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास मनाई आहे. मात्र यानंतरही धार्मिक स्थऴे, शाळांजवळच्या जागा फेरीवाल्यांना बसण्यास देण्याबाबतची यादी तयार केली जाते आहे. पालिकेने अशी यादी तयार केली तरी याबाबतचा निर्णय नागरिकांच्या सूचनांनुसारच घेतला जाणार असल्याची माहिती पालिका सूत्रांकडून देण्यात आली आहे.

मुंबईत 85 हजार 891 जागा फेरीवाल्यांना बसण्यासाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. या जागांबाबत सूचना व हरकती मागवण्यात आल्या आहेत. यानंतर आता पालिकेने मुंबईतील प्रमुख व गजबजलेल्या सिध्दीविनायक मंदिर, हाजीअली, बाबुलनाथ, माऊंटमेरी, जामा मस्सिद, इस्कॉन मंदिर, गुरुव्दारा खालसा सभा, स्मामीनारायण मंदिर आदी प्रमुख धार्मिक स्थळांची यादी तयार केली आहे. त्यानुसार मुंबईतील प्रमुख गजबजणा-या धार्मिक स्थळ, शाळांजवळपास फेरीवाल्यांना नियमानुसार बसण्यासाठी जागा निश्चित केली जाणार आहे. यासाठी मुंबईतील गजबजणारी धार्मिक स्थळे, व जास्त विद्यार्थी संख्या असणा-या शाळांबाबत जनतेच्या सूचना विचारात घेतल्या जाणार आहे. फूल, अगरबत्ती, मेणबत्ती, फळे, चादर आदी विक्री करणा-या फेरीवाल्यांना कुठे अधिकृतपणे बसता येणार ? हे ठरणार आहे. धार्मिक स्थळांप्रमाणे शाळा, रेल्वेस्थानक परिसर व रुग्णालये येथेही नियमानुसार फेरीवाल्यांना बसवले जाणार आहे. या सर्वांची बसण्याच्या जागांची यादी नागरिकांच्या सूचनांनंतरच अंतीम केली जाणार आहे. मुंबईतील प्रमुख व गजबजलेल्या स्थळांची यादी करता येणार नाही. मात्र जी यादी तयार केली जाणार आहे, त्या यादीला जनतेच्या सूचनांनुसारच अंतीम स्वरुप दिले जाणार आहे. अंतीम झालेल्या जागांवरील फेरीवाल्यांना ओळखपत्र दिले जाणार असल्याची माहिती एका अधिका-यांने दिली.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom