वस्तू व सेवा निर्यातीत महाराष्ट्र देशात अव्वल - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

29 January 2018

वस्तू व सेवा निर्यातीत महाराष्ट्र देशात अव्वल


नवी दिल्ली - वस्तू व सेवा निर्यातीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे. देशाच्या एकूण वस्तू व सेवा निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा २२.३ टक्के इतका आहे.

देशाचा आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल 2017- 2018 आज प्रकाशित करण्यात आला. या अहवालानुसार वस्तू व सेवा निर्यातीमध्ये देशातील महाराष्ट्र ,गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू,तेलंगणा ही पाच राज्ये अग्रेसर ठरली आहेत. या पाच राज्यांचा वाटा देशाच्या एकूण निर्यातीपैकी 70.1 टक्के इतका आहे. या पाच राज्यांपैकी महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक म्हणजे 22.3 टक्के इतका आहे. गुजरात राज्य 17.2 टक्के निर्यातीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. कर्नाटक 12.7,तिसऱ्या स्थानावर, तामिळनाडू 11.5 टक्क्यासह चौथ्या तर तेलंगणा 6.4 टक्के निर्यातीसह पाचव्या स्थानावर राहिले आहे.

आंतरराज्य व्यापारात महाराष्ट्र प्रथम -
देशातील राज्यांतर्गत व्यापारात महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, ओडिशा आणि तामिळनाडू ही राज्ये अग्रेसर ठरली आहेत. महाराष्ट्र आंतरराज्य व्यापारात 15.7 टक्के निर्यात तर 13.7 टक्के आयातीसह अव्वल ठरले आहे.

जीएसटी नोंदणीत महाराष्ट्र टॉप 4 राज्यात -
वस्तू व सेवा कर नोंदणीमध्ये देशातील महाराष्ट्र, उत्तर प्रदेश ,तामिळनाडू ही चार राज्ये अग्रेसर ठरली आहेत.

Post Top Ad

test