२०१८ मध्ये भारताचा विकास दर ७.३ टक्के राहणार ? - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 January 2018

२०१८ मध्ये भारताचा विकास दर ७.३ टक्के राहणार ?


मुंबई - गेल्या वर्षभरात चलन निश्चलीकरण आणि जीएसटी करप्रणाली लागू केल्यामुळे भारताची आर्थिक गाडी घसरल्याचा अंदाज देशातील सर्वच तज्ञांनी व्यक्त केला. तसेच त्याचे प्रतिबिंब बाजारातही उमटले. मात्र जागतिक बँकेने मात्र २०१८ हे वर्ष भारतासाठी आश्वासक असल्याचे चित्र मांडत भारताचा विकास दर ७.३ वर पोहचेल असा विश्वास २०१८ ग्लोबल इकॉनामिक्स अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. तसेच त्यानंतरच्या पुढील दोन वर्षाच्या काळात हा विकास दर ७.५ टक्क्यांवर पोहोचणार असल्याचे मतही व्यक्त केले आहे. केंद्र सरकारकडून करण्यात येत असलेल्या व्यापक सुधारणांमुळे भारतात इतर देशांच्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत विकासाची अधिक क्षमता असल्याचे भाष्य जागतिक बँकेने केले आहे.

नोटबंदी आणि जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेला सुरूवातीला झटका बसला असला तरी २०१७-१८ या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर ६.७ टक्के राहणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. याबाबत जागतिक बँकेच्या डेव्हलपमेंट प्रॉस्पेक्टस समूहाचे संचालक अयान कोस म्हणाले की, भारत सर्व प्रकारे पुढील दहा वर्षात अन्य मोठ्या उभरत्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत अधिक विकास दर नोंदवण्याच्या दिशेने पुढे जात आहे. दीर्घ कालावधीचा विचार करता भारताकडे विकासासाठी खूप जास्त क्षमता आहे. दरम्यान, आर्थिक वर्ष २०१७-१८ या वर्षात जीडीपी दर ६.५ टक्क्यांवर राहणार असल्याचा अंदाज सेंट्रल स्टँस्टेस्टीक्स ऑफिस (सीएसओ) ने वर्तवला आहे. मागील चार वर्षातील म्हणजे मोदी सरकारच्या कार्यकाळातील जीडीपीतील वाढीचा हा सर्वाधिक नीचांकी स्तर राहणार आहे.

भारताच्या तुलनेत चीनच्या विकास वेग मंदावत आहे. तर भारताच्या विकास दरात हळूहळू तेजी येत असल्याची आशा जागतिक बँकेला असून वर्ष २०१७ मध्ये चीनचा विकास दर ६.८ टक्के राहणार आहे. हा दर भारतापेक्षा ०.१ टक्के अधिक आहे. २०१८ मध्ये चीनचा विकास दर ६.४ टक्के राहण्याचा अंदाज असून पुढील दोन वर्षांचा विचार केला असता चीनच्या विकास दरात थोडीसी घट येईल असा अंदाज अयान कोस यांनी व्यक्त केला आहे.

Post Bottom Ad