Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

कमला मिल आगप्रकरणी प्रत्येक दोषीवर कारवाई करा - ज्युलिओ रिबेरो


मुंबई । प्रतिनिधी - २९ डिसेंबरला कमला मिल परसिरातील मोजोस आणि वन अबव्ह या दोन पबला लागलेल्या आगीमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला. आगीप्रकरणी पोलिसांनी पब मालक व व्यवस्थापकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा करत दोषींना अटक केली आहे. तरीही अश्या घटना इतर ठिकणीही घडण्याची शक्यता असल्याने शहरातील सर्व पबचे फायर आॅडिट करावे तसेच या आगीची चौकशीसाठी एसआयटी पथक नेमून दोषींवर कारवाई करण्यात यावी. यामागणीसाठी माजी पोलिस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे.

मागील वर्षाच्या शेवटच्या दिवसात कमला मिल परिसरातील ट्रेंड हाऊस या इमारतीच्या गच्चीवर चालणाऱ्या मोजोस आणि वन अबोव्ह पबला आग लागली. या आगीमध्ये १४ ज्यांचा मृत्यू झाला. कमला मिल कंपाऊंडमधील ट्रेड हाऊस येथील वन अबोव्ह व मोजोस बिस्ट्रो हे पब बेकायदेशीर असून त्यांच्याकडे आग प्रतिबंधक साधने नव्हती. तरीही राजरोसपणे हे पब सुरू होते. त्यामुळे अग्निशमन दलाने त्या विभागातील पब, बार, हाॅटेल आणि रेस्टाॅरंटचं फायर आॅडिट करावं. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महापालिकेने विशेष अधिकारी नेमावेत. तसेच या आगीची चौकशी करण्यासाठी पोलिसांच्या सहआयुक्त पदाच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांने करावी. जेणेकरून या प्रकरणात प्रत्येक दोषीवर गुन्हा नोंदवून त्यावर कारवाई व्हावी, अशी विनंती करणारी फौजदारी जनहित याचिका मुंबईचे माजी पोलिस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom