‘कमला मिल’ दुर्घटनेचा अहवाल शुक्रवारपर्यंत - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

08 January 2018

‘कमला मिल’ दुर्घटनेचा अहवाल शुक्रवारपर्यंत


मुंबई । प्रतिनिधी - कमला मिल परिसरातील मोजोस आणि वन अबव्ह या दोन पबला आग लागून १४ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर ही आग हुक्क्याच्या ठिणगीमुळे लागल्याचा अहवाल अग्निशमन दलाने दिला. या दुर्घटनेप्रकरणी पालिकेने विभागातील नागरिकांना हे पुरावे सादर करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आज अनेक स्थानिकांनी संबंधित आस्थापनांच्या नियमबाह्य कामांचे पुरावे आयुक्त अजोय मेहतांकडे सादर केले. याशिवाय मेलवरही अनेक पुरावे पाठवण्यात आले आहेत. यावर अंतिम अहवाल शुक्रवापर्यंत पूर्ण करणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

कमला मिल दुर्घटने प्रकरणी पालिकेने केलेल्या आवाहनानुसार आयुक्त अजोय मेहता यांच्या दालनात स्थानिकांनी हे पुरावे सादर केले. मात्र हे पुरावे गोपनीय ठेवणार असून अंतिम अहवालात याचे स्पष्टिकरण देणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. काही नागरिकांनी पुरावे सादर करण्यासाठी वेळ मागितली आहे. त्यामुळे आणखी पुरावे सादर करण्यासाठी मुदतवाढ देणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. नागरिकांच्या वेळेनुसार हे पुरावे दाखल करून घेणार असल्याचे ते म्हणाले. यामध्ये प्रत्येक इच्छुकाला आपले मत मांडण्याची संधी देण्यात येणार असून नागरिकांनी लवकरात लवकर पुरावे सादर करावेत असे आवाहनही त्यांनी केले आहे. ‘कमला मिल’ दुर्घटनेप्रकरणी आता फक्त अग्निशमन दलाचा रिपोर्ट आला आहे. मात्र या ठिकाणचे बेकायदा बांधकाम, नियम-परवान्यातील अटींचे उल्लंघन याबाबत एक अहवाल तयार करणार आहे. हा अहवाल लवकरच तयार होईल. या दरम्यान व्यावसायिक आस्थापनांमधील धोकादायक ठिकाणांची पाहणी करून कारवाई सुरूच राहील असे आयुक्त अजोय मेहता यांनी स्पष्ट केले आहे .

Post Top Ad

test
test