Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मनसेच्या सहा फुटीर नगरसेवकांच्या प्रकरणावर लवकरच पडदा पडणार


मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महानगर पालिकेतील मनसेच्या सहा नागरसेवकांनी आपल्या पक्षाला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला. याबाबत कोंकण आयुक्तांकडे गेले कित्तेक महिने सुनावणी प्रलंबित होती. गेले कित्तेक महिने सुनावणी प्रलंबित असल्याने या प्रकरणी उलट सुलट चर्चा सुरु होती. दरम्यान गुरुवारी याप्रकरणी सुनावणी घेऊन दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यावर येत्या दोन दिवसात याबाबतचा निकाल घोषित केला जाणार आहे. यामुळे मनसेच्या या फुटीर नगरसेवकांच्या प्रकरणावर आता लवकरच पडदा पडणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या फेब्रुवारी २०१७ मध्ये संपन्न झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते. भांडुप येथील काँग्रेसच्या नगरसेविका प्रतिभा पाटील यांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या जागी पोटनिवडणुकीत पाटील यांची सून भाजपच्या तिकिटावर जिंकून आल्या. भाजपच्या उमेदवार जिंकल्याने भाजपच्या नेत्यांनी भाजपाचा महापौर बसवण्याचे वक्तव्य केले. यामुळे भाजपाकडून राजकीय उलथापालथं होण्याआधीच शिवसेनेने मनसेचे सहा नगरसेवक आपल्या गळाला लावले. मनसेच्या सहाही नगरसेवकांनी शिवसेनेनेत प्रवेश केला. यादरम्यान मनसेकडून या सहा नगरसेवकांविरोधात कोंकण आयुक्तांकडे तक्रार दाखल करून त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी करण्यात आली. याप्रकरणी गेले कित्तेक महिने अनेक कारणांनी सुनावणी पुढे ढकलण्यात येत होती. यामुळे कोंकण आयुक्तांकडे सुनावणी कधी होणार असा प्रश्नही उपस्थित केला जात होता.

दरम्यान कोंकण आयुक्तांच्या मुंबई येथील कार्यालयात गुरुवारी सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान दोन्ही पक्षांचे वकील आणि शिवसेना नेते व आमदार अ‍ॅड. अनिल परब उपस्थित होते. सुनावणीवेळी दोन्ही पक्षाच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. मनसेच्या वकिलांनी सहाही नगरसेवक आमचेच असल्याचा दावा केला तर शिवसेनेनकडून या सहा नगरसेवकांना आपल्या पक्षात समावेश केल्याचे पत्र दिल्याची माहिती दिली. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेल्यावर याबाबत दोन दिवसात निकाल जाहीर करू असे आयुक्तांनी सांगितल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यामुळे मनसेच्या फुटीर नगरसेवकांच्या प्रकाणावर लवकरच पडदा पडण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

मनसेला कायद्याचे दार उघडे आहे -
या नगरसेवकांच्या गट स्थापनेची मागणी आम्ही केली नियमात राहून मागणी केली आहे. शिवसेनेचे ८४ नगरसेवक असून, तीन अपक्ष आणि मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेले सहा अशी एकूण ९३ नगरसेवक संख्या आहे. त्याचा तपशील गुरुवारी कोकण विभागीय आयुक्तांकडे ठेवला आहे. ‘शिवसेनेत आलेल्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यासाठी मनसेला कायद्याचे दार उघडे आहे, आम्ही त्यालाही तयार आहोत.
- अ‍ॅड. अनिल परब, आमदार शिवसेना

त्यांना नगरसेवक पद सोडावे लागेल -
हे नगरसेवक ‘मनसे’च्या चिन्हावर निवडून आले आहेत त्यांना शिवसेनेत प्रवेश करायचा असल्यास त्यांना नगरसेवक पद सोडावे लागेल. त्यासाठी काही दाखले आम्ही कोकण विभागीय आयुक्तांसामोर ठेवले आहेत
- अक्षय काशीद, मनसेचे वकील

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom