नायर दुर्घटनेनंतर एमआरएसाठी प्रतीक्षायादी वाढली - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 January 2018

नायर दुर्घटनेनंतर एमआरएसाठी प्रतीक्षायादी वाढली


मुंबई । प्रतिनिधी -
नायर रुग्णालयांत रविवारी एमआरआय मशीनमध्ये अडकून राजेश मारू या युवकाचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर नायर रुग्णालयातील एमआरआय मशीन दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे पालिकेच्या इतर रुग्णालयांत एमआरआयसाठी येणा-या रुग्णांची प्रतीक्षा यादी वाढत चालली आहे. पालिकेच्या रुग्णालयात एमआरआय करण्यासाठी मागील सहा ते सात महिन्यांपासून प्रतीक्षा यादी आहे. जूनमध्ये एमआरआयसाठी नंबर लावलेल्या रुग्णांना जानेवारी अखेरीस तपासणीसाठी वेळ मिळत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळावी आहे.

रविवारी नायर रुग्णालयांत एमआरआय मशिनने खेचल्याने एकाला जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर येथील एमआरआय मशिन बंद आहे. मुंबई महापालिकेच्या सर्व केईएम, सायन, नायर, कुपर, कांदीवली आणि गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात मिळून एकूण ६ एमआरआय मशिन आहेत. त्यांपैकी आता नायर हॉस्पिटल मधील दुर्घटनेनंतर येथील मशिन बंद असल्याने रुग्णांसाठी अवघ्या 5 मशिन उपलब्ध आहेत. तर, राज्य शासनाच्या जीटी आणि जेजे रुग्णालयांमध्ये एक- एक एमआरआय़ मशिन उपलब्ध आहे. बाह्यरुग्णांना एमआरआय साठी दोन ते तीन महिने थांबावे लागते. तर महापालिकेच्या रुग्णालयातील आंतररुग्णांना एमआरआयसाठी प्राधान्य दिले जाते. मात्र, नायर रुग्णालयांमधील दुर्घटनेनंतर आता केईएम आणि शिव येथील लोकमान्य रुग्णालयांतील एमआरआय युनिटवरील ताण वाढला आहे. या आधी दोन ते तीन महिन्यांची असणारी प्रतीक्षा यादी होती, आता ही यादी वाढली आहे. सद्या केईएम, सायन रुग्णालयांत आंतररुग्ण दोन ते तीन दिवस तर बाह्यरुग्ण ३ ते ४ महिने वेटींगवर असल्याची माहिती आहे. मागील जून, जुलैपासून एमआरआय तपासणीसाठी वेटिंगवर असलेल्या रुग्णांना जानेवारी अखेरची तपासणी वेळ मिळाली आहे. ही यादी अजून वाढण्याची शक्यता आहे. महापालिका रुग्णालयांत सरासरी 35 जणांचे एमआरआय केले जाते. एमआरआयसाठी महापालिका रुग्णालयांचा दर अडीच हजार रुपये आहे तर खाजगी रुग्णालयांत हाच दर ७ ते १२ हजारांपर्यंत आहे. सध्या नायर हाँस्पिटलमध्ये दुर्घटनेनंतर बंद पडलेल्या एमआरआय मशिनची तपासणी सुरु आहे. येत्या 3 ते 4 दिवसांत ही मशिन पुन्हा सुरु होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

Post Bottom Ad