Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

नगरसेवकांना तब्बल एक वर्षाने मिळणार पालिकेचा मोबाईल


नगरसेवकांना दरमहा मोबाईलचे बिलही मिळणार -
मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांना हायटेक करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून मोबाईल आणि लॅपटॉप वाटप करण्यात येते. फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक संपन्न होऊन एक वर्ष व्हायला आले तरी अद्याप नगरसेवकांना महापालिकेकडून मोबाईल आणि लॅपटॉप वाटप करण्यात आलेले नाही. यामुळे नगरसेवकांना आपल्या खाजगी मोबाईलवरून नागरिकांशी संपर्क साधावा लागत आहे. मात्र आता तब्बल एक वर्षाने नगरसेवकांना मोबाईल मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तसा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत सादर करण्यात आला असून गटनेत्यांच्या मंजुरीनंतर नगरसेवकांना मोबाईल वाटप होणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या २२७ तसेच नामनिर्देशित ५ अश्या एकूण २३२ नगरसेवकांना नागरी कामांसाठी व महानगरपालिका अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधता यावा म्हणून २०१२ ते २०१७ या कालावधीतील नगरसेवकांना महापालिकेद्वारे प्रत्येकी १० हजार ५०० रुपये इतक्या किमतीचा मोबाईल संच, त्याची दुरुस्ती व देखभाल करावी या अटीवर कायमस्वारूपी देण्यात आला होता. आता फेब्रुवारी २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या २२७ व नामनिर्देशित ५ अश्या २३२ नगरसेवकांना मोबाईल संच पुरवण्याबाबतचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीसमोर सादर करण्यात आला आहे. नगरसेवकांना देण्यात येणाऱ्या मोबाईल खरेदीसाठी २०१७ - १८ च्या अर्थसंकल्पात ३४ लाख ६१ हजार रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे.

नगरसेवकांना मोबाईल खरेदीसाठी ऑप्पो कंपनीचा २ जीबी रॅम १६ जीबी मेमरी ८ मेगापिक्सल कॅमेरा असलेला ९९९० रुपयांचा ए ३७, ऑप्पो कंपनीचा ३ जीबी रॅम १६ जीबी मेमरी १३ मेगापिक्सल कॅमेरा असलेला १२९९० रुपयांचा ए ७१, सॅमसंग कंपनीचा २ जीबी रॅम ३२ जीबी मेमरी १३ मेगापिक्सल कॅमेरा असलेला १२९९० रुपयांचा जे ५ प्राईम, सॅमसंग कंपनीचा २ जीबी रॅम १६ जीबी मेमरी १३ मेगापिक्सल कॅमेरा असलेला ११४९० रुपयांचा जे ७ एनएक्सटी, व्हिओ कंपनीचा २ जीबी रॅम १६ जीबी मेमरी १३ मेगापिक्सल कॅमेरा असलेला ९९९० रुपयांचा वाय ५३, व्हिओ कंपनीचा ३ जीबी रॅम १६ जीबी मेमरी १३ मेगापिक्सल कॅमेरा असलेला १२९९० रुपयांचा वाय ५५ एस, मोटरोला कंपनीचा ४ जीबी रॅम ३२ जीबी मेमरी १६ मेगापिक्सल कॅमेरा असलेला १३९९९ रुपयांचा मोटो जी ५ एस, मोटरोला कंपनीचा ३ जीबी रॅम ३२ जीबी मेमरी १६ मेगापिक्सल कॅमेरा असलेला १३९९९ रुपयांचा मोटो एम या मोबाईलची यादी प्रस्तावासोबत जोडण्यात आली असून यापैकी एका कंपनीचा मोबाईल नगरसेवकांना कायमस्वरूपी देण्यासाठी निवडण्याचे प्रस्तावात सुचवण्यात आले आहे.

नगरसेवकांना मोबाईलचे बिलही मिळणार - 
मुंबई महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या २२७ तसेच नामनिर्देशित ५ अश्या २३२ नगरसेवकांना मोबाईलचे बिल म्हणून दरमहा ११०० रुपये दिले जाणार आहेत. तसेच सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, विविध समित्यांचे अध्यक्षांना दरमहा ३ हजर रुपये दिले जाणार आहे. सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, विविध समित्यांचे अध्यक्ष आपल्या पदावरून पायउतार झाल्यास त्यांना पुन्हा नगरसेवक म्हणून असलेले ११०० रुपये इतके रुपये मोबाईल बिलसाठी दिले जाणार आहेत. तसेच सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, विविध समित्यांच्या अध्यक्षांनी आपले मोबाईल प्रीपेड असल्याचे निदर्शनास आणले आहे. यामुळे त्यांनी मोबाईल बिल न देता ३ हजार रुपये आपल्या मानधनात वाढ करून द्यावी अशी मागणी केली आहे. याबाबत गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय घ्यावा असे प्रस्तावात म्हटले आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom