मुंबई अग्निशमन अधिका-यांना कारकुनांचे काम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 January 2018

मुंबई अग्निशमन अधिका-यांना कारकुनांचे काम


मुंबई | प्रतिनिधी -
आग विझवने, आग प्रतिबंधात्मक योजना राबवणे यासाठी अग्निशमन दलातील अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलातील अग्निशमन केंद्र अधिकारी यांना लिपिक वर्गाचे काम करण्यास सांगण्यात आले आहे. याकडे पालिका आयुक्तांचे लक्ष वेधले असतानाही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप फायर ब्रिग्रेड ऑफिसर्स असोसिएशनने केला आहे. सध्या मुंबई भरात सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. यासाठी मनुष्यबळ कमी असतानाही दलातील काही अधिका-यांना लिपिक वर्गाचे काम करण्याबाबत सांगण्यात आले आहे. त्यामुळे या कामांत अधिकारी गुंतले आहेत. परिणामी आगीबाबत प्रतिबंधात्मक योजना राबवणे किंवा आग विझवण्याच्या कामांमध्ये अधिका-यांना लक्ष देता येणे शक्य नाही. याबाबत चर्चा करण्यासाठी पालिका आयुक्तांची वेळ मागण्यात आली, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्य़ाचे संघटनेचे अध्यक्ष अॅड प्रकाश देवदास यांनी सांगितले.

Post Bottom Ad