Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

जकात नाक्यांचा वापर कोस्टल रोडच्या वेल्डिंग कामासाठी


मुंबई | प्रतिनिधी - देशभरात जुलै २०१७ पासून जीएसटी लागू झाल्याने मुंबई महानगरपालिकेची जकात बंद झाली. जकात बंद झाल्याने पालिकेला जकात नाके बंद करावे लागले. जकात नाके ओस पडल्याने नाक्यावर अतिक्रमण होण्याची भीती व्यक्त केली जात होती. जकात नाक्याची जागा पोलीस चौक्या उभारण्यासाठी द्यावी अशीही मागणी करण्यात आली. मात्र जकात नाक्यांच्या जागेचा वापर आता पालिकेच्या महत्वकांक्षी असलेल्या कोस्टल रोडच्या वेल्डिंग व इतर कामांसाठी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

जकातीतून मुंबई महापालिकेला सर्वात जास्त महसूल मिळत होता. मात्र जीएसटी लागू झाल्याने मिळणाऱ्या जकातच्या महसुलवर पालिकेला पाणी सोडावे लागले. मुंबईत पाच जकात नाके आहेत. हे नाके पालिकेच्या मालकीचे असून जकात बंद झाल्यानंतर वापरावीना आहेत. या नाक्यांच्या जागेवर अनेकांचा डोळा होता. पालिकेच्या सभांमध्ये यावरती अतिक्रमण होण्याची भीती नगरसेवकांनी व्यक्त केली होती. जकात नाक्यांचा वापर करण्याचा निर्णय काही महिने होत नसल्याने यावर अतिक्रमण होणार अशी चर्चा होती. मात्र पालिका या जकात नाक्यांचा वापर आगामी कोस्टल रोडप्रकल्पाच्या वेल्डिंग कामासाठी करणार आहे. कोस्टल रोड हा पालिकेचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असून येत्या एप्रिल महिन्यापासून त्याचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे रिकाम्या जकात नाक्यांचा उपयोग या कामांसाठी होणार असल्याने त्यावर होणारे अतिक्रमणांची भीती दूर झाली आहे. दरम्यान, या नाक्यांवर अनेक बिल्डरांचा जागा हडपण्याचा डाव होता. पालिकेने तातडीने निर्णय घेऊन हा डाव हाणून पाडला. येत्या काही दिवसांतच या नाक्यांवर कोस्टल रोडच्या कामासाठी वापर करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती, सूत्रांनी दिली. त्यामुळे अतिक्रमणातून जकात नाक्यांची सुटका होणार आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom