Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

महाराष्ट्राला 10 पद्म पुरस्कार


नवी दिल्ली - सर्वोच्च नागरी पद्म पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली, प्रसिध्द शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खान यांना पद्म विभूषण, प्रसिद्ध सतार वादक अरविंद पारीख यांना पद्म भूषण तर प्रसिद्ध साहित्यीक गंगाधर पानतावणे, प्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी यांच्यासह महाराष्ट्रातील अन्य सहा मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.

दरवर्षी गणराज्य दिनाच्या पुर्वसंध्येला पद्म पुरस्काराची घोषणा होते. यावर्षी पद्म विभूषण पुरस्कार ३ मान्यवरांना जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रातून प्रसिध्द शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खान यांना संगीत क्षेत्रातातील अतुलनीय व उल्लेखनीय कार्यासाठी पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी प्रसिध्द सतार वादक अरविंद पारीख यांना पद्म भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

वैद्यकीय सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातून पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांमध्ये साहित्य व शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदानासाठी दोन मान्यवरांची निवड झाली आहे, यात साहित्यीक गंगाधर पानतावणे व शिक्षणतज्ज्ञ अरविंद गुप्ता यांचा समावेश आहे. याशिवाय कला क्षेत्रासाठी प्रसिध्द कलाकार मनोज जोशी, व्यापार व उद्योग क्षेत्रासाठी रामेश्वरलाल काबरा, कला व चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी‍ शिशीर मिश्रा, क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी मुरलीकांत पेटकर,सामाजिक कार्यासाठी संपत रामटेके यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

यावर्षी एकूण 85 पद्म पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये 3 पद्म विभूषण, 9 पद्म भूषण आणि 73 पद्मश्री पुरस्कार सामील आहेत. यासह 14 माहिला तर 16 हे अप्रवासी भारतीय,परदेशी नागरिक आहेत. 3 मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom