Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

प्रलंबित मागण्यांसाठी रेल्वे कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन


मुंबई । प्रतिनिधी - रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईच्या सीएसटीएम स्थानकात आज धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मान्य न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

रेल्वेमध्ये काम करणाऱ्या मोटरमन व गार्डना ओव्हर टाइम भत्ता, रनिंग अलाउन्स, इत्यादी भत्ते २०१६ पासून देण्यात आलेले नाहीत. ७ वेतन आयोगसाठी कमिटी नेमण्यात आली मात्र त्या कमिटीने अद्याप आपला अहवाल सादर केलेला नाही. रेल्वेमध्ये खाजगीकरण केले जात आहे. याच्या निषेधार्थ एआयआरएफ व एनआरएमयु या संघटनांच्या वतीने सीएसटीएम स्थानकात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी एसआरएमयुचे महामंत्री वेणू नायर यांनी मागण्या मान्य न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom