'फेरीवाला झोन'बाबत सूचना हरकती नोंदवा - राज ठाकरे - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

17 January 2018

'फेरीवाला झोन'बाबत सूचना हरकती नोंदवा - राज ठाकरे


मुंबई । प्रतिनिधी - मुंबईत फेरीवाल्यांविरोधात आक्रमक झालेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरा बाहेर आणि कार्यालयाबाहेर फेरीवाला झोन केल्याने मनसे आता आणखी आक्रमक झाली आहे. नागरिकांना फेरीवाला झोन बाबत नागरिकांनी हरकती व सूचना नोंदवण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. नागरिकांनी नोंदवलेल्या हरकती सूचना मी स्वतः पालिका आयुक्तांना सादर करणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

मुंबईमध्ये गेल्या काही महिन्यापासून फेरीवाल्यांचा प्रश्न गाजत आहे. फेरीवाल्यांना विरोध करणाऱ्या आणि फेरीवाल्यांविरोधात खळखट्याक आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान व मनसेच्या कार्यालयाबाहेरच फेरीवाल्यांना बसण्यासाठी महापालिकेने फेरीवाला झोन तयार केला आहे. पालिकेने जाहीर केलेल्या यादीनुसार मनसेचे मुख्यालय असलेल्या पद्माबाई ठक्कर मार्गावरील राजगड कार्यालयाबाहेर १०० तर शिवाजी पार्क येथील केळुस्कर रोडवर असलेल्या राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवास स्थानाबाहेर १० फेरीवाले बसवण्यास पालिकेने मंजुरी दिली आहे. यामुळे फेरीवाल्यांवर मनसे पुन्हा आक्रमक झाली आहे. याविरोधात माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेचे सर्व नेते व विभाग अध्यक्षांची एक बैठक कृष्णकुंजवर बोलावली होती. या बैठकीत मुंबईतील ज्या ज्या रस्त्यांवर फेरीवाला झोन निश्चित करण्यात आला आहे, त्या त्या रस्त्यांवरील इमारती, सोसायटींमध्ये जाऊन तेथील रहिवाशांनी महापालिका कार्यालयात जाऊन हरकती व सूचना नोंदवण्याचं आवाहन करा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या दिले आहेत. रहिवाशांनी नोंदवलेल्या या हरकतींची एक प्रत मनसे पदाधिकाऱ्यांनी घ्यावी. या सर्व हरकतींचं निवेदन महापालिका आयुक्तांना सादर करेन असे राज यांनी यावेळी सांगितले आहे. 

Post Top Ad

test
test