Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे १८ जानेवारीला भीकमांगो आंदोलन


मुंबई । प्रतिनिधी - मुंबईसह इतर महानगरपालिकांमधील कंत्राटी सफाई कामगारांना समान काम समान वेतन, इतर सुविधा तसेच कायमस्वरूपी नोकरीवर घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. या विरोधात सफाई कामगार पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. तसेच पंतप्रधानांचे कंत्राटी सफाई कामगारांकडे लक्ष वेधीत करण्यासाठी भीकमांगो आंदोलन केले जाणार असल्याची माहिती कचरा वाहतूक श्रमिक संघाचे सरचिटणीस मिलिंद रानडे यांनी दिली.

मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्ररकर परिषदेत बोलताना मुंबई ठाणे नवी मुंबई महापालिकेत काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांची १९५५ कोटींची थकबाकी आहे. अद्याप ११२ कंत्राटी सफाई कामगारांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यांच्यापैकी एकालाही अद्याप नुकसान भरपाई देण्यात नाही. कंत्राटी सफाई कामगारांचे प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे गायब आहेत अश्या परिस्थितीत आम्ही कसे जगायचे असा प्रश्न रानडे यांनी उपस्थित केला आहे. कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन न दिल्यास फरकाच्या १० पट दंडाची कायद्यात तरतूद आहे. परंतू या कायद्याचा १९४८ पासून एकदाही वापर करण्यात आलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेतील २७०० कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याचे आदेश दिले आहेत. असे आदेश देऊन आठ महिने झाले तरी अद्याप या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेतले नसल्याचे रानडे यांनी सांगितले. कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे महापालिका दुर्लक्ष करत असल्याने सरकार आणि महापालिकेचे लक्ष केंद्रित करण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेतली जाणार असून १८ जानेवारीला मंत्रालय, चर्चगेट, सीएसटी या ठिकाणी भीकमांगो आंदोलन केले जाणार असल्याची माहहती रानडे यांनी दिली.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom