बियर बार, हुक्‍का पार्लर, डिस्‍को थेक मध्‍यरात्री १.३० पर्यंत सुरु राहणार - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

11 January 2018

बियर बार, हुक्‍का पार्लर, डिस्‍को थेक मध्‍यरात्री १.३० पर्यंत सुरु राहणार


मुंबई । प्रतिनिधी - महाराष्‍ट्र शासनाच्‍या अधिसुचनेनुसार महाराष्‍ट्र (दुकाने व आस्‍थापना) अधिनियम १९४८ रद्द करण्‍यात आलेला आहे. त्‍याऐवजी महाराष्‍ट्र दुकाने व आस्‍थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ लागू झालेला आहे. या अधिनियमानुसार बियर बार, परमिट रुम, हुक्‍का पार्लर, डिस्‍को थेक जेथे मद्य पुरविण्‍यात येते सकाळी ११.३० ते मध्‍यरात्री १.३० पर्यंत, दारु व सर्व प्रकारची मद्याची दुकाने सकाळी ११.३० ते रात्री ११.३० पर्यंत तर चित्रपट, सिनेमागृह इत्‍यादी मध्‍यरात्री १ पर्यंत सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

याबाबत बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या सांकेतिक स्‍थळावर उपलब्‍ध असलेले नोंदणीकरण, नुतनीकरण, बदल इत्‍यादी कामकाज नवीन अधिनियमानुसार पुढीलप्रमाणे बदल करण्‍यात येत आहेत. १ ते ९ कामगार संख्‍या असलेल्‍या आस्‍थापनांना नोंदणीकरण, नुतनीकरण, बदल इत्‍यादीबाबत ऑनलाईन अर्ज स्‍वीकारणे बंद करण्‍यात आलेले आहे. १० व त्‍यापेक्षा जास्‍त कामगार संख्‍या असलेल्‍या आस्‍थापनांना नोंदणीकरण, नुतनीकरण, बदल इत्‍यादीबाबत ऑनलाईन सेवा सुरु राहील. महाराष्‍ट्र दुकाने व आस्‍थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ अन्‍वये दुकाने व आस्‍थापना खात्‍यात कार्यरत असलेल्‍या कर्मचाऱयांच्‍या पदाचे संबोधन ‘निरीक्षक’ ऐवजी ‘सुलभक’ असे करण्‍यात आले असल्याचे पालिकेकडून कळविण्यात आले आहे.

Post Top Ad

test
test