बेस्टचा अपंगमुक्तीचा निर्धार - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 January 2018

बेस्टचा अपंगमुक्तीचा निर्धार


मुंबई । प्रतिनिधी -
बेस्ट प्रशासनाकडून आपली सामाजिक बांधिलकीची जाण ठेऊन मुंबईतील अपंगांसाठी जयपुरी फूट तसेच पोलिओ पीडित व्यक्तींसाठी मोफत कॅलिपर्स देण्यात येणार आहे. मुंबईतील रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट च्या सहकार्याने बेस्ट कडून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे व बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांच्या पुढाकाराने मुंबईकरांसाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. सदर उपक्रमाची सुरुवात नुकतीच बेस्टचे अध्यक्ष अनिल कोकीळ यांच्या हस्ते करण्यात आली. या योजनेनुसार मुंबईतील जनतेला उपक्रमाची माहिती व्हावी यासाठी बेस्टच्या सर्व ३३५० बसगाड्यामध्ये स्टिकर्स लावण्यात येणार आहेत. ज्यांना मोफत जयपूर फूट किंवा कॅलिपर्सची गरज असेल यांच्यासाठी संपर्क क्रमांक देण्यात येणार आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर रत्ननिधी ट्रस्टकडून मोफत सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Post Bottom Ad