Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

पालिका शाळांच्या पुनर्बांधकामाबरोबर मैदानांचाही विकास होणार


मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महापालिकेच्या शाळांच्या मैदानांचा विकास करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. महापालिका शाळांच्या मोकळ्या मैदानांचा विकास करण्यासंबंधी एकूण ७ महापालिका शाळांच्या खेळाच्या मैदानांचा विकास करण्याचे धोरण निश्चित झाले आहे. यापूर्वी चार शाळांच्या मैदानांचा विकास करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. आता आणखी तीन शाळांच्या मैदानांचा विकास करण्यासाठीचा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेच्या शाळांच्या मैदानांच्या ठिकाणी फुटबॉल, व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी तसेच बास्केटबॉल खेळण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. मुलुंडमधील एस. एल. रोड महापालिका शाळेच्या मैदानात ही सुविधा उपलब्ध होणार आहे. प्रत्यक्षात या शालेय इमारतीची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतलेला असतानाच या शाळेच्या मैदानावर क्रीडांगण विकसित करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे शालेय इमारतीच्या पुनर्बांधकामात या मैदानाची दूरवस्था होणार असल्याने या कामावर होणा-या कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जाण्याची शक्यता आहे. पूर्व उपनगरातल्या टी विभागातील एस. एल. रोड महापालिका शाळा, एन विभागातील रमाबाई सहकार नगर नंबर ३ शाळा आणि एम-पूर्व येथील देवनार कॉलनी महापालिका शाळांच्या मैदानांमध्ये फुटबॉल, व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, बॉस्केटबॉलची सुविधा उपलब्ध करून विकास केला जाणार आहे. यासाठी विक्रांत कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात आले आहे. या तिन्ही शाळांच्या मैदानासाठी १ कोटी १६ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. या शाळांच्या मैदानांचा विकास करण्यासाठी प्रशासनाने नाल्यांची बांधणी करणाऱ्या कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. या शाळांच्या मैदानाचा विकास करणाऱ्या विक्रांत कन्स्ट्रक्शन या कंपनीने पूर्व उपनगरातील यापूर्वीच्या प्रभाग ११३ व ११४ मधील विविध पर्जन्य जलवाहिन्यांच्या कल्वर्टमधील सुधारणा करण्याच्या किरकोळ कामांचे कंत्राट मिळवले आहे. या कामाच्या अनुभवाच्या जोरावर मैदानांचा विकास करण्याचे काम या कंपनीला देण्यात आले आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom