मुंबई अग्निशमन दलाच्‍या शौर्याचा मला अभिमान - महापौर - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

25 January 2018

मुंबई अग्निशमन दलाच्‍या शौर्याचा मला अभिमान - महापौर


मुंबई । प्रतिनिधी - मुंबईत विविध ठिकाणी लागलेल्‍या आगीच्‍या घटनांमध्‍ये मुंबई अग्निशमन दलाचे जवान आपला जीव धोक्‍यात घालून मुंबईकर नागरिकांचे जीव व वित्ताचे रक्षण करित असून त्‍यांच्‍या सामुहिक नेतृत्‍वामुळेच आगीवर नियंत्रण मिळविणे शक्‍य होत असल्‍याने या दलाच्‍या शौर्याचा मला अभिमान असल्‍याचे प्रतिपादन मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी केले.
६२ अग्निशमन अधिकारी व कर्मचारी यांच्‍या असामान्‍य शौर्याबद्दलचे आयुक्‍तांचे रजतपदक प्रदान सोहळा मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्‍या हस्‍ते महापालिका मुख्‍यालयातील महापालिका सभागृहात पार पडला, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना प्रत्‍येक माणसाच्‍या अंगी हिम्‍मत असणे आवश्‍यक असून ती अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्‍यामध्‍ये ठासून भरली असल्‍याने या हिम्मतीच्‍या जोरावरच आपण अनेक कठीण प्रसंगी त्‍यावर मात करुन यशस्‍वीरित्‍या बाहेर पडले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. जगामध्‍ये आपल्‍याबद्दल एक आदर असून प्रसंगी कुटुंबाकडे दुर्लक्ष करुन आपण कर्तव्‍याला प्रथम प्राधान्‍य दिले आहे. यामुळे प्रत्‍येकाने अंतःकरणपूर्वक आपला सन्‍मान केला पाहिजे, असे महापौर म्‍हणाले. महापालिका आयुक्‍त अजोय मेहता यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाले की, स्‍वतःचा जीव धोक्‍यात घालून दुसऱयाचे प्राण वाचविणाऱयांना शौर्य पदक देणे हा शौर्य पदक देण्‍यामागे हेतू असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.तसेच त्‍यांच्‍या टिमवर्कचे योगदान सुध्‍दा तेवढेच महत्‍वपूर्ण असल्‍याचे ते म्‍हणाले. यासोबतच येणाऱया पिढीला प्रोत्‍साहन मिळावे हा हेतुसुध्‍दा यामागे असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. गत दोन वर्षात अग्निशमन दलाचे आधुनिकीकरण करण्‍यावर आम्‍ही भर दिला असून यापुढील काळात आग लागूच नये यासाठी खबरदारीच्‍या उपाययोजना आम्‍ही करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. बृहन्‍मुंबई महापालिकेचा अग्निशमन दलाचा देश व विदेशात एक मोठा दबदबा असून त्‍यांनी तो टिकवून ठेवावा असे आवाहन आयुक्तांनी केले.

याप्रसंगी महापालिका आयुक्‍त अजोय मेहता, स्‍थायी समिती अध्‍यक्ष रमेश कोरगांवकर, सुधार समितीचे अध्यक्ष अनंत नर, बेस्‍ट समितीचे अध्‍यक्ष अनिल कोकीळ, स्‍थापत्‍य समिती (उपनगरे) अध्‍यक्ष तुळशीराम शिंदे, माजी महापौर तथा नगरसेविका स्‍नेहल आंबेकर, स्‍थानिक नगरसेवि‍का सुजाता सानप, नगरसेवक मंगेश सातमकर, नगरसेविका सुजाता पाटेकर, अतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त आय.ए. कुंदन, उप आयुक्‍त (मध्‍यवर्ती खरेदी खाते) रामभाऊ धस, प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभाग रहांगदळे हे मान्‍यवर उपस्थित होते. यावेळी शहीद अग्निशमन अधिकारी सुधीर अ‍मिन यांना जाहिर झालेले प्रशस्‍तीपत्र त्‍यांच्‍या पत्‍नीने मान्‍यवरांच्‍या हस्‍ते स्विकारले. कार्यक्रमाला शौर्यपदक प्राप्‍त अधिकारी व कर्मचारी तसेच त्‍यांचे कुटुंबिय मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Post Top Ad

test
test