मंड्यामधील शुल्क वाढीमुळे मांस, मटण, मासे महागणार - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

17 January 2018

मंड्यामधील शुल्क वाढीमुळे मांस, मटण, मासे महागणार


मंड्यामधील अनुज्ञापन शुल्क दुप्पट करण्याचा प्रस्ताव -
मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेच्या बाजार विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या मंड्यांच्या अनुज्ञापन शुल्क, गाळ्यांचे भाडे यामध्ये दुप्पट वाढ करण्याचे पालिका प्रशासनाने सुचवले आहे. तसा प्रस्ताव महापालिकेच्या विधी समितीसमोर मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. मंड्यांमधील शुल्क दरवाढ दुप्पट केली जाणार असल्याने त्याचा थेट परिणाम यामधून विकल्या जाणाऱ्या वस्तू, मांस, मटण, मासे इत्यादींच्या दरांमध्येही वाढ होणार आहे. यामुळे या प्रस्तावावरून विधी समितीत खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या बाजार विभागाच्या शुल्क अनुसूची भाग ३ मध्ये सुधारणा केली जाणार आहे. बाजार विभागाच्या मंडयामध्ये वसूल करण्यात येणाऱ्या वार्षिक अनुज्ञापन शुल्कात सन २००० मध्ये सुधारणा करण्यात आली होती. या शुल्का व्यतिरिक्त घाऊक बाजारसंबंधित व बाह्य मांस संबंधित इतर बाबी अंतर्भूत आहेत. २००० नंतर १६ वर्षाचा कालावधी उलटला आहे. या कालावधीत महागाईचा दर वाढलेला आहे. महापालिका मंड्याच्या माध्यमातून नागरिकंना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता शुल्क आणि भाडे दरामध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याने पालिका प्रशासनाने शुल्क व भाडेवाडीचा प्रस्ताव विधी समितीसमोर मंजुरीसाठी सादर केला आहे.

प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार मंड्यामधील बाजारात कोणतीही वस्तू, मांस, कोंबड्या, व इतर वस्तू विकण्यासाठी, दलालीच्या अनुज्ञापत्रासाठी, अनुज्ञापत्र वारसांच्या नावे हस्तांतरण करण्यासाठीच्या शुल्क दरात दुप्पट वाढ सुचवली आहे. सदर शुल्क दरवाढीचा प्रस्ताव विधी समिती व त्यानंतर पालिका सभागृहात मंजुर झाल्यास त्या नंतर येणाऱ्या महिन्यापासून दर वाढ लागू केली जाणार असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे. यामुळे पालिका मंड्यांमध्ये विकल्या जाणाऱ्या मांस, कोंबड्या, मासे तसेच इत्यादी सर्वच वस्तूंची दरवाढ होणार आहे. दरम्यान प्रशासनाने सादर केलेला प्रस्ताव दुप्पट दरवाढीचा असल्याने विधी समितीमध्ये यावरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

दरवाढ ----                                                सध्याचे दर     प्रस्तावित दर (रुपयांमध्ये)
कोणतीही वस्तू विकण्यासाठी                            २००                 ४००
गोठवलेले मांस मासळी                                   १५००              ३०००
ताजे मांस मासळी                                           १५००              ३०००
खाजगी बाजारातील मांसाची दुकाने गाळे          १०००              २०००
खाजगी बाजारातील कोंबड्यांची दुकाने गाळे      ५००              १०००
खाजगी बाजारातील कोंबड्यां ठेवणे                 १०००              २०००
बाहेर गावावरून मांस आयात केल्यास २० किलोला ५०             १००
मांस, काळीज, रक्त तपासणी शुल्क                   १००                २००
दलालीच्या अनुज्ञापत्रासाठी गाळ्याशिवाय         १५००              ३०००
दलालीच्या अनुज्ञापत्रासाठी गाळ्यासह              १६००              ३२००

Post Top Ad

test
test