Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

पटसंख्या कमी दाखवून शाळा बंद केल्यास अनुदान परत घ्या


शिक्षण समिती अध्यक्षांचे प्रशासनाला निर्देश -
मुंबई | प्रतिनिधी -
मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमधील पटसंख्या कमी दाखवून शाळेची जागा खासगी विकासकाच्या घश्यात घालण्याचा प्रकार शिक्षण समितीच्या बैठकीत उघड झाला. कांदिवली डहाणूकर वाडी येथील ‘बालक विहार’ शाळा बंद करण्याचे कारस्थान सुरू आहे. शाळा सुरु राहावी म्हणून स्थानिकांनी अनेक वेळा आंदोलनेही केली आहेत. त्यामुळे ही शाळा बंद केली जाणार असल्यास शाळेला देण्यात आलेले अनुदान वसूल करण्यात यावे असे निर्देश शिक्षण समिती अध्यक्ष शुभदा गुडेकर यांनी प्रशासनाला दिले.

कांदिवली येथे राममोहन लोहिया शिक्षण संस्थेची ही शाळा आहे. मात्र या शाळेत सध्या पहिली ते चौथीपर्यंत विद्यार्थी मिळत नसल्यामुळे ही शाळा बंद करण्याची परवानगी द्यावी असा प्रस्ताव प्रशासनाने शिक्षण समितीत सादर करण्यात आला. या शाळेत सध्या दोन सहाय्यक शिक्षक, लिपीक आणि शिपाई असे चार कर्मचारी काम करत आहेत. या शाळेला पालिका २०१५ पर्यंत मान्यता मुदतवाढ, अनुदान देत असल्याचे शुभदा गुढेकर यांनी सांगितले. मात्र संबंधित शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक प्रवेश नाकारून शाळा बंद करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे त्या म्हणाल्या. शाळा व्यवस्थापन ही जागा खासगी विकासकाला देणार आहे. यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यामुळे आवश्यकता असल्यास पुन्हा वर्ग बांधा आणि शाळा सुरू करा, असे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले. या शाळेची जागा नक्की कुणाची आहे याची चौकशी करून अहवाल सादर करा असे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom