Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मध्य रेल्वेवरही मोबाईल तिकीट व्हेंडिंग मशिन्स


मुंबई । प्रतिनिधी - मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या सोयीसाठी २४ स्थानकांवर मोबाईल तिकीट व्हेंडिंग मशिन्स बसवण्यात आल्या आहेत. मोबाईलवर ऍपद्वारे काढण्यात आलेले तिकीट मशिनमध्ये मोबाईल स्कॅन करुन काही मिनिटांत प्रवाशांना तिकीट मिळणार आहे. यामुळे रेल्वे स्थानकांमधील तिकिटांच्या खिडक्यांवरील गर्दी कमी होणार आहे.

पश्चिम रेल्वेवर दोन दिवसांपूर्वी तिकीट व्हेंडिंग कियोक्स मशिन सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता ही सेवा मध्य रेल्वेच्या ५ स्थानकांवर उपलब्ध होणार आहे. युटीएस मोबाईल अपद्वारे तिकीट बुक करणाऱ्यांना तिकिटाचे प्रिंटआऊट हवे असेल, तर मोबाईलवर येणारा आयडी आणि मोबाईल क्रमांक एटीव्हीएमवर टाकणे अनिवार्य होते. ही प्रक्रिया वेळ खाऊ होती. पण, आता तिकीट व्हेंडिंग कियोक्स मशिनवर थेट मोबाईल स्कॅन करुन त्वरीत तिकिटाची प्रिंट मिळेल. उपनगरीय स्थानकांवरील प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने २४ मोबाईल तिकीट व्हेंडिंग मशिन्स कार्यान्वित केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण या ५ स्थानकांवर हे मशिन बसवण्यात आले आहेत. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकावर ४ तर, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण स्थानकांवर प्रत्येकी ५ मोबाईल तिकीट व्हेंडिंग मशिन्स बसवण्यात आल्या आहेत. उपनगरीय लोकल प्रवाशांना लोकल तिकिटांसाठी तिकीट खिडकी, एटीव्हीएम, स्मार्टकार्ड, अधिकृत एजंट यांसह आता मोबाईल तिकिट व्हेंडिंग मशिन्समधून देखील तिकीट घेता येणार आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom