Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

बंदमुळे मुंबईत वाहतुकीवर परिणाम


मरेच्या ११० तर परेच्या ६० ट्रेन रद्द -
९० बसेसची मोडतोड -
मुंबई - पुण्याच्या भीमा कोरेगांव येथे भीम सैनिकांवर केलेल्या दगडफेकीचे आणि त्यांच्या गाड्या जाळण्याचे घटनेचे पडसाद राज्यभर उमटले. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यावर महाराष्ट्रात बंद पाळण्यात आला. याला मुंबईही अपवाद राहिलेली नाही. मुंबईमध्ये रास्ता आणि रेल रोको मुळे रेल्वे, बस आणि मेट्रोच्या वाहतुकीवर परिणाम झाला.

बंदमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावर परिणाम झाला. रेल रोकोमुळे सर्वात जास्त परिणाम मध्य आणि हार्बर मार्गावर झाला. भीम सैनिकांनी ठाणे, डोंबिवली, कल्याण, कांजूरमार्ग, घाटकोपर, विक्रोळी, कुर्ला, मानखुर्द, गोवंडी, दादर, गोरेगाव, कांदिवली, विरार, गोवंडी, चेंबूर, जुईनगर,शिवडी इत्यादी स्थानकांवर रेल रोको आंदोलन केले. आंदोलकांनी रेल ट्रॅकवर उतरुन आंदोलन केल्यामुळे वाहतूक मोठ्या विस्कळीत झाली. या आंदोलनादरम्यान मध्य आणि हार्बर मार्गावर संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ११० उपनगरीय ट्रेन्स रद्द करण्यात आल्या. पश्चिम रेल्वेवरील ६० उपनगरीय ट्रेन्स रद्द करण्यात आल्या तर, २०० पेक्षा जास्त ट्रेन्स त्यांच्या निर्धारीत वेळेपेक्षा उशिरा चालल्या. सायंकाळी आंदोलन मागे घेतल्यावर रेल्वे सेवा हळूहळू सुरळीत होत असून तिन्ही मार्गावरील सेवा सध्या २० ते २५ मिनिटं उशिराने सुरू आहेत. मेट्रो स्थानकातही आंदोलन करून मेट्रो रेल्वे बंद केल्याने मेट्रोची सेवा बंद करण्यात आली होती.

बंद दरम्यान मुंबईत बेस्ट उपक्रमाने दिवसभरात आपल्या ताफ्यातील ३३७० पैकी ३२०८ बसेस रस्त्यावर उतरवल्या होत्या. यापैकी सायंकाळी ७. ३० वाजता उपलबध झालेल्या माहितीनुसार ९० बसेसची मोडतोड करण्यात आली आहे. यात आसारजी गरजे, अरुण मिरगळ, नितिन वाघमारे, शशिकांत गोसावी हे चार बस ड्रायव्हर काचा लागल्याने जखमी झाले आहे. बंद दरम्यान मुंबईत ठीक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आल्याने बस मार्गामध्ये बदल करण्यात आल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे. भीमा कोरेगांवच्या घटनेच्या निषेधार्थ मुंबईत सोमवारपासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनादरम्यान सोमवारी ३ तर मंगळवारी १७ बस गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. या आंदोलना दरम्यान गेल्या तीन दिवसात ११० बसेसची तोडफोड करण्यात आली.

जखमी ड्रायव्हरची माहिती - 
1) आसारजी विश्वनाथ गरजे
डेपो- प्रतीक्षा नगर, ठिकाण - जिजामाता नगर, बसमार्ग 172.
2) अरुण गणपत मिरगळ
डेपो - मध्य मुंबई, ठिकाण- वरळी नाका , बसमार्ग 154.
3) नितिन कमलाकर वाघमारे
डेपो - मजास, ठिकाण- पवई, बसमार्ग - 496.
4) शशिकांत गणपत गोसावी
डेपो - सांताक्रूझ, ठिकाण - मोतीलाल नगर, बसमार्ग- 229.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom