फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून नितेश राणेंचे मातोश्रीला आव्हान - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 January 2018

फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून नितेश राणेंचे मातोश्रीला आव्हान


मुंबई । प्रतिनिधी - आमच्या घराला लागून शाळा आहे, तरी देखील हॉकर्स झोन तयार करण्यात आला. हे उद्धव ठाकरे यांचे गलिच्छ राजकारण असल्याची टीका आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी केली. कमला मिल कंपाऊंडमधील आग दुर्घटनेनंतर पालिकेची कारवाईबाबत आमदार नितेश राणे यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेऴी फेरीवाल्यांच्या जागांबाबत पत्रकारांनी विचारले असता राणे यांनी मातोश्री समोर फेरीवाले कसे उभे करायचे हे आम्हाला माहीत आहे असे वक्तव्य करून थेट मातोश्रीला आव्हान दिले आहे.

कमला मिल आग दुर्घटनेला जबाबदार असणा-यांवर पालिकेने कारवाई केली. मात्र त्यांनतरही 24 तासांमध्ये बार आणि हुक्का पार्लर पुन्हा सुरू झाले. त्यामुळे तुम्हाला प्रामाणिकपणे कारवाई करायची आहे का? असा प्रश्न नितेश राणे यांनी गुरुवारी पालिका आयुक्तांच्या भेटी दरम्यान उपस्थित केला. संबंधित सहाय्यक आयुक्तांना निलंबित करा अशी मागणीही आमदार नितेश राणे यांनी आयुक्तांकडे केल्याचे त्यांनी सांगितले. कमला मिल कंपाऊंड मध्ये लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा बळी गेला. यानंतर पालिकेने संबंधित पब चालक- मालकांवर कारवाई सुरू केली. मात्र त्यानंतर 24 तासानंतर हुक्का पार्लर सुरू झाले. याला सहायक आयुक्तही जबाबदार आहेत, त्यांच्यावर कारवाई कधी होणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राणे यांना फेरीवाल्यांच्या जागाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, मातोश्री समोर फेरीवाले कसे उभे करायचे हे आम्हाला माहीत आहे. आमच्या घराला लागून शाळा आहे, तरी देखील हॉकर्स झोन तयार करण्यात आला. याबाबत उद्धव ठाकरे यांचे गलिच्छ राजकारण असल्याची टीका आमदार नितेश राणे यांनी केली. तुम्ही गरीब फेरीवाल्यांचा वापर आमच्या विरोधात करता आहात, यावरूनच तुमचे राजकारण कळते, असा आरोपही नितेश राणे यांनी यावेळी केला. कमला मिल प्रकरणा नंतर जी कारवाई केली त्यांनतर देखील 24 तासांमध्ये बार आणि हुक्का पार्लर पुन्हा सुरू झाले. त्यामुळे तुम्हाला प्रामाणिकपणे कारवाई करायची आहे का? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला. संबंधित सहायक आयुक्तांना निलंबित करा असे सांगत नितेश राणे यांनी पालिकेवर देखील टीका केली. एवढी घटना होऊनही प्रशासनाला काही वाटत नाही का? पालिकेची भीती हुक्का पार्लर यांना राहिली नाही हे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले असल्याचे राणे यांनी सांगितले.

Post Bottom Ad