मनसेतून शिवसेनेत प्रवेश करणारे परमेश्वर कदम एसीबीच्या रडारवर - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

31 January 2018

मनसेतून शिवसेनेत प्रवेश करणारे परमेश्वर कदम एसीबीच्या रडारवर


मुंबई । प्रतिनिधी -
मनसेच्या सात पैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. याविरोधात कोंकण आयुक्तांकडे सुनावणी सुरु होती. कोंकण आयुक्तांकडील केसचा निकाल मनसेच्या सहा फुटीर नगरसेवकांच्या बाजूने लागला आहे. हा निकाल लागून एक आठवडाही झाला नसताना दहा वर्षापूर्वीच्या ते एका प्रकरणाचा ससेमिरा मनसेतून शिवसेनेत प्रवेश करणारे नगरसेवक परमेश्वर कदम यांच्या पाठीमागे सुरू झाला आहे. मागील नगरसेवक पदाच्या काळात कदम यांनी भ्रष्टाचार करून आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती गोळा केल्याच्या आरोपाखाली कदम यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे परमेश्वर कदम आता एसीबीच्या ऱडावर आले आहेत.

चार महिन्यांपूर्वी मनसेला धक्का देत पाच नगरसेवकांसह कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र मनसेने कोकण विभागीय आयुक्तांकडे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्याने कदम यांच्या शिवसेना प्रवेशावर अडचणी आल्या. तब्बल चार महिने कदम यांना कोकण आयुक्तांच्या कार्यालयात सुनावणीसाठी हजर राहावे लागले. नुकतेच त्यांचा शिवसेनेतल्या प्रवेशावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले. मात्र आठवडाभरानंतर कदम यांच्या पाठीमागे ससेमिरा सुरू झाला असून ते एसीबीच्या ऱडारवर आहेत. ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत गैरमार्गाने अधिक संपत्ती मिळवल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्याविरोधात एसीबीकडे तक्रार दाखल करण्यात आली. 2007 ते 2012 या नगरसेवक पदाच्या काळात भ्रष्टाचार करून अमाप संपत्ती गोळा केल्याच्या आरोपाखाली चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत 13 लाख 9 हजार इतकी म्हणजे, ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत ६४ टक्के अधिक संपत्ती त्यांच्याकडे मिळाल्याचे समोर आले आहे. परमेश्वर कदम हे घाटकोपर पूर्व येथील प्रभाग क्र १२८ चे नगरसेवक आहेत. मनसेतून शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे, त्यांनी पालिकेतील कोणत्याही समित्यांच्या सभांना उपस्थित राहण्याची परवानगी मिळू नये, अशी नियमाचा आधार घेऊन मनसेने कोकण आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर त्यांना तब्बल चार महिने सभांना बसता येत नव्हते. मात्र आठवडाभरापूर्वी याबाबतचा निर्णय़ लागून त्यांच्या शिवसेनेतल्या प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला. त्यामुऴे चार महिन्यांनंतर त्यांना शिवसेनेसोबत बसण्याचा मार्ग मोकऴा झाला. मात्र आता आठवडाभरानंतरच भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ते एसीबीच्या चौकशीच्या फे-यात अडकले आहेत.

Post Top Ad

test
test