Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

अंथरुणाला खिळलेल्या १०४ वर्षाच्या आजीवर यशस्वी शस्त्रक्रिया


मुंबई । प्रतिनिधी - मुलुंड येथील उपासनी सुपर स्पेशिअॅलिटी रुग्णालयात डॉ. तेजस उपासनी यांच्या नेतृत्वाखालील ऑर्थोपेडिक शल्यविशारदांच्या पथकाने १०४ वर्षांच्या रुग्ण गंगा लालजी गाला यांच्यावर हिप फ्रॅक्चर सांधण्यासाठी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. गाला यांची हालचाल वयोमानाने कमी झाल्यामुळे ते पलंगावरुन उठताना पडल्या. त्यावेळी त्यांना दुखापतीमुळे तीव्र वेदना झाल्या.

गंगा लालजी गाला यांच्या हालचाली वयोमानामुळे संथ होत होत्या. मुलुंड येथे राहणाऱ्या गाला पलंगावरून पडल्या. त्यामुळे त्यांच्या उजव्या नितंबाला फ्रॅक्चर झाले. त्या कोणतीच हालचाल करू शकत नव्हत्या. त्यांना तीव्र वेदनाही होत होत्या. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना त्वरित उपासनी सुपर स्पेशिअॅलिटी रुग्णालयात नेले. गाला यांची काळजीपूर्वक तपासणी केल्यानंतर डॉ. तेजस उपासनी यांनी त्यांना आशेचा किरण दाखवला. त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचा टेकू (सपोर्ट) आवश्यक होता. या वयाच्या रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया त्यांच्या वेदना कमी करण्यासाठी केली जाते. यामुळे त्यांना निदान बिछान्यात हालचाल करणे, कुशीवर वळणे एवढे करी करणे शक्य होते. भूलीचा (अनस्थेशिया) कमी डोस वापरून गाला यांचे फ्रॅक्चर सांधण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. ही शस्त्रक्रिया प्रभावी होणे आवश्यक होते. अशा पद्धतीच्या शस्त्रक्रिया रुग्णालयात यापूर्वी करण्यात आल्या आहेत. त्यांचे वय आणि अवस्था बघता शस्त्रक्रिया करावी की नाही अशा द्विधा मन:स्थितीत आम्ही होतो. अशा प्रकारच्या फ्रॅक्चरमध्ये शस्त्रक्रिया करणे अधिक चांगले ठरते. कारण त्यामुळे रुग्णाचे आयुष्य वाढते. शस्त्रक्रिया न केल्यास बेड सोअर्स (बिछान्यावर पडून राहिल्याने होणाऱ्या जखमा), छातीत प्रादुर्भाव किंवा मूत्रमार्गात प्रादुर्भाव अशा अन्य काही समस्या निर्माण होऊ शकतात.” “वयोवृद्ध रुग्णांमध्ये नितंबाच्या फ्रॅक्चरमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वर्षाला ३० ते ४० टक्के आहे. त्यामुळे रुग्णाचे आयुर्मान वाढवण्यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रिया करणे चांगले ठरते. आम्ही शस्त्रक्रियेनंतर त्यांच्याकडून काही व्यायाम करून घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे बिछान्यावर हालचाल करण्याच्या सूचना दिल्या आहेत असे उपासनी सुपर स्पेशिअॅलिटी रुग्णालयातील ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. तेजस उपासनी यांनी सांगितले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom