२१ फेब्रुवारीला मुंबई शहराचा पाणीपुरवठा बंद - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

18 February 2018

२१ फेब्रुवारीला मुंबई शहराचा पाणीपुरवठा बंद


मुंबई । प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे भंडारवाडा जलकुंभ येथे जुन्या १२०० मि.मी. व्यासाच्या बाबुला टँक जलवहिनीची दुरुस्ती आणि रफी अहमद किडवाई मार्गावरील नवीन १५०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यासाठी नया नगर, माथारपखाडी व शिवडी कोर्ट जंक्शन येथे सदर जलवाहिनी जुन्या जलवाहिनीसोबत जोडणी करण्याचे काम २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत हाती घेण्यात येत आहे. सदर काम करण्याकरीता भंडारवाडा टेकडी जलकुंभ, गोलंजी टेकडी जलकुंभ, फोसबेरी जलकुंभ १२ तासांकरीता बंद करावे लागणार आहेत. यामुळे २१ फेब्रुवारी रोजी मुंबई शहरात पाणीपुरवठा होणार नाही असे महापालिकेकडून कळविण्यात आले आहे.

बुधवार २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत ‘ए’ विभागात नेवल डॉक व बी.पी.टी., ‘बी’ विभागात पी. डिमेलो रोड, संत तुकाराम रोड, फ्लँक रोड, केशवजी नाईक रोड, बी.पी.टी., ‘ई’ विभागात बी.पी.टी., मोदी कम्पाऊंड, डी.एन. सिंग रोड, हुसेन पटेल रोड, रामचंद्र भट्ट मार्ग, ई. एस. पाटणवाला मार्ग, मोतीशहा लेन, डॉ. मस्करहॅन्स रोड, रामभाऊ भोगले मार्ग, डॉकयार्ड रोड, गनपावडर रोड,कारपेंटर रोड, नवाब टँक रोड, बॅरीस्टर नाथ पै मार्ग, जे. जे. हॉस्पिटल तसेच ‘एफ/दक्षिण विभा गात जी. डी. आंबेकर रोड, परेल मौजे (व्हिलेज),एकनाथ घाडी मार्ग, जिजामाता नगर झोपडपट्टी, आंबेवाडी, डी. जी. महाजनी रोड, टि. जे. रोड, आचार्य दोंदे मार्ग, बारादेवी, शिवाजी नगर,के. ई. एम. व टाटा हॉस्पिटल या विभागात पाणीपुरवठा होणार नाही. तसेच काही ठिकाणी पाण्याचा दाब कमी राहील. या पाणीकपाती दरम्यान जलाशयातील पातळी लक्षात घेऊन आवश्यकता भासल्यास विभागवार पाण्याच्या वेळेत बदल करण्यात येईल. तरी या विभागांतील नागरिकांनी याची नोंद घ्यावी, पाणी साठवून ठेवावे व जपून वापरावे तसेच महानगरपालिकेला, भविष्यात चांगली सेवा देण्यासाठी, सहकार्य करावे असे आवाहन पालिकेद्वारे करण्यात आले आहे.

Post Top Ad

test