Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

एसी लोकलने फक्त २५ हजार प्रवाशांनीच केला प्रवास


प्रवासी वाढवण्यासाठी तिकीट बोगीतच देण्याचा निर्णय -
मुंबई । प्रतिनिधी -
पश्चिम रेल्वेवर मोठा गाजावाजा करत नाताळच्या मुहूर्तावर (२५ डिसेंबरला) पहिली वातानुकूलित (एसी) लोकल सुरु करण्यात आली. एसी लोकलसाठी साध्या लोकलच्या फेऱ्या रद्द करून वातानुकूलित लोकल चालवण्यात आली. एसी लोकलचे दर प्रथम दर्जाच्या तिकीट आणि पास दरापेक्षा जास्त आहेत. प्रथम दर्जाचे तिकीट धारक आणि पासधारकांना वातानुकूलित तिकीट व पास यामधील फरकाचे पैसे भरून प्रवास करावा, अशी मुभा प्रवाशांना देण्यात आली. तरीदेखील प्रथम दर्जाचे आणि ठरावीक प्रवासी वगळता व्दितीय दर्जाच्या प्रवाशांनी ‘न परवडणाऱ्या दरामुळे एसी लोकलकडे पाठ फिरवली आहे. डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यात फक्त २५ हजार प्रवाशांनीच प्रवास केला आहे. तसेच या लोकलमधून फुकट्या आणि ठराविक अंतरापेक्षा जास्त अंतरापेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी पश्चिम रेल्वेने एसी लोकलमधील तिकीट तपासनिसांना तिकीट मशीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

एसी लोकलने डिसेंबर महिन्यात २ हजार १२१ प्रवाशांनी प्रवास केला, त्यामाध्यमातून ४ लाख ९२ हजार ४७५ रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले. जानेवारी महिन्यात २३ हजार १५३ प्रवाशांनी प्रवास केला, त्यामाध्यमातून ८० लाख १५ हजार ३४४ रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले. एसी लोकलने अद्याप एकूण २५ हजार २७४ प्रवाशांनी प्रवास केला असून त्यामाध्यमातून ८५ लाख ७ हजार ८१९ रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले. डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यात ५४२ प्रवाशांना विनातिकीट प्रवास करताना पकडण्यात आले, त्यांच्याकडून २ लाख ५ हजार १२० रुपये दंड वसूल करण्यात आला. तर २ हजार १२५ प्रवाशांना ठराविक अंतरापेक्षा जास्त प्रवास करताना पकडण्यात आले, त्यांच्याकडून ६ लाख ७१ हजार २१४ रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये प्रथम दर्जाच्या तिकीट आणि पासच्या फरकाची रक्कम भरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचाही समावेश असल्याचे समजते. त्यामुळेच एसी लोकलचे प्रवासी वाढवण्यासाठी तसेच प्रवाशांकडून ठराविक अंतरापेक्षा जास्त अंतराच्या तिकिटाची रक्कम वसूल करता यावी म्हणून तिकीट तपासनिसांकडे तिकीट मशीन उपलब्ध करून दिले जाणार आहे. तिकीट मशीनसाठी रेल्वे सूचना प्रणाली केंद्रासोबत (क्रिस) करार करण्यात आला आहे. हातात वापरण्यात येणाऱ्या तिकीट मशीनची चाचणी यशस्वी झालेली आहे. आठवडाभरात या मशीन उपलब्ध होतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे. एसी लोकलमध्ये इलेक्ट्रिक यंत्रणा, दरवाजे बंद होण्यास विलंब आणि अन्य सॉफ्टवेअर अडचणी होत्या. मात्र, त्या अडचणीही दूर करण्यात आल्याची माहितीही पश्चिम रेल्वेद्वारे देण्यात आली आहे.

असं असेल तिकीट मशिन - 
क्रिसकडून २ ईटीएम म्हणजेच इलेक्ट्रिक तिकीट मशिन्स देण्यात आलेल्या आहेत. ६ इंचाची एक मशीन असेल. त्यासोबत एक छोटा प्रिंटरही देण्यात येणार आहे. तिकीट तपासणीस त्यामधून तिकीट देतील. तिकीट मशिनसाठी रेल्वे सूचना प्रणाली केंद्रासोबत (क्रिस) करार करण्यात आला आहे. या मशीनमुळे प्रथम दर्जा आणि मासिक पासधारकांना तिकीट फरकाचे पैसे देत एसी बोगीचे तिकीट मिळणार आहे. सध्या पासधारकांना तिकीट खिडकीवरून एसीचे अतिरिक्त तिकीट काढावे लागत आहे. यामुळे प्रतहाम दर्जाच्या प्रवाशांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा रेल्वे प्रशासनाला आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom