बेस्टच्या वीज ग्राहकांसाठी अभय योजना - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 February 2018

बेस्टच्या वीज ग्राहकांसाठी अभय योजना


मुंबई । प्रतिनिधी - 
बेस्ट उपक्रमात ज्यांचे वीजमापक, वीजदेयकांची थकबाकी न भरल्यामुळे दिनांक ०१ ऑक्टोबर २००६ ते ३१ डिसेंबर २०१४ या कालावधीत काढण्यात आले आहेत,अशा वीज ग्राहकांसाठी अभय योजना- २०१८ राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत थकबाकीवरील व्याज व विलंबित आकारांची माफी बेस्ट उपक्रम ग्राहकांना देणार आहे. या योजनेचा फायदा वीज ग्राहक दिनांक ०१ फेब्रुवारी २०१८ ते ३१ जुलै २०१८ या सहा महिन्यांच्या कालावधीत घेऊ शकतात. या योजनेबाबतच्या अधिक माहितीसाठी वीज ग्राहकांनी संबंधित प्रभागाच्या विभागीय अभियंता, ग्राहक सेवा यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन बेस्ट उपक्रमाद्वारे करण्यात आले आहे.

Post Bottom Ad