Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

शस्त्र परवानाधारकांना माहिती देण्याचे गृह विभागाचे आवाहन

मुंबई - केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयामार्फत देशभरातील दि.1 एप्रिल 2016 पर्यंतच्या शस्त्र परवानाधारक, शस्त्र दुरुस्ती/खरेदी-विक्री परवानाधारकांची माहिती NDAL (National Database for Arms Licenses) या प्रणालीमध्ये नोंदविण्याची मुदत 31 मार्च 2018 पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे त्यामुळे महाराष्ट्रातील दि. 1 एप्रिल 2016 पर्यंतच्या सर्व शस्त्र परवानाधारकांनी तातडीने संबंधित जिल्हाधिकारी/जिल्हादंडाधिकारी किंवा पोलीस आयुक्त यांच्याशी तात्काळ संपर्क साधून त्यांच्या शस्त्र परवान्याची माहिती उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन राज्य शासनाच्या गृह विभागाने केले आहे. यापूर्वी ही प्रक्रिया दि.31 मार्च 2017 रोजी बंद करण्यात आली होती. परंतु आता केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने (आंतरिक सुरक्षा II) दि.28 नोव्हेंबर 2017 च्या अधिसूचनेद्वारे NDAL प्रणालीमध्ये माहिती नोंदवून घेण्याची अंतिम मुदत दि.31 मार्च 2018 पर्यंत वाढविलेली आहे.

शस्त्र परवानाधारक, शस्त्र दुरुस्ती/खरेदी-विक्री परवानाधारकांची माहिती NDAL (National Database of Arms Licenses) या प्रणालीद्वारे गोळा करण्यात येते. या प्रणालीद्वारे माहिती अद्ययावत केल्यानंतर प्रत्येक परवानाधारकास विशिष्ट ओळख क्रमांक (UIN – Unique Identification Number) देण्यात येतो. या माहितीमध्ये परवानाधारकाची संपूर्ण माहिती,शस्त्राची तसेच शस्त्र उत्पादक व वितरक आदींची माहिती भरणे आवश्यक आहे. ही माहिती भरल्यानंतर प्रत्येक परवानाधारकास विशिष्ट ओळख क्रमांक घेणे बंधनकारक असून असा क्रमांक न घेतल्यास संबंधित शस्त्र परवानाधारकांचा शस्त्र परवाना रद्द होणार आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या गृह विभागाने शस्त्र परवानाधारक तसेच उत्पादक व वितरकांनी तातडीने माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom