'ई निविदे'ऐवजी सीडब्लूसी कॉन्ट्रॅक्टर पद्धत सुरु करा - - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 February 2018

'ई निविदे'ऐवजी सीडब्लूसी कॉन्ट्रॅक्टर पद्धत सुरु करा -


मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महानगरपालिकेची कामे देताना भ्रष्टाचार होत असल्याने ई - निविदा पद्धत अवलंबण्यात आली. मात्र ई निविदा पद्धतीमुळे कामे देण्यासाठी वेळ वाया जात आहे. यामुळे पालिकेकडून कामे देण्यासाठी वापरली जाणारी जुनी सीडब्ल्यूसी कॉन्ट्रॅक्टर पद्धत पुन्हा सुरु करावी अशी मागणी शिवसेना नगरसेवक मंगेश सातमकर यांनी केली आहे.

मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांमध्ये विभाग पातळीवर छोटी कामे सीडब्लूसी कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून करण्यात येत होती. त्यामध्ये पालिका प्रशासनाने बदल करून ई निविदा पद्धत सुरु केली. ई निविदा कार्यपद्धती वेळखाऊ आहे. त्यात अनेक तांत्रिक अडचणी असल्याने नगरसेवकांनी सुचवलेली विभागातील विकास कामे विहित वेळेत पूर्ण होत नाहीत. तसेच कंत्राटदार अंदाजापेक्षा ५० टक्के किंवा त्याहून कमी रक्कमेच्या निविदा सादर करतात. अशा कामांचा दर्जाही निकृष्ट असल्याने लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागते. त्यामुळे विभाग पातळीवरील कामांसाठी ई निविदा प्रक्रिया रद्द करून पूर्वीप्रमाणेच सीडब्लूसी कॉन्ट्रॅक्टर पद्धत पुन्हा सुरु करावी अशी मागणी मंगेश सातमकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.

Post Bottom Ad