लवकरच हार्बर मार्गाचा प्रवास गोरेगावपर्यंत - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

21 February 2018

लवकरच हार्बर मार्गाचा प्रवास गोरेगावपर्यंत


मुंबई | प्रतिनिधी - गेले कित्तेक वर्षे हार्बर रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते गोरेगांव पर्यंतचा प्रवास अनेक कारणांनी रखडला होता. आता या मार्गावरील ओव्हरहेड वायरचा विद्युतप्रवाह सुरू करून बम्बार्डिअर लोकलची गोरेगावपर्यंत यशस्वी चाचणी मंगळवारी करण्यात आली. रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या मंजुरीनंतर या मार्गावर वाहतूक सुरु होण्याची शक्यता आहे.

हार्बर मार्गाचा विस्तार गोरेगावपर्यंत करण्याची योजना रेल्वे प्रशासनाने आखली होती. मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प (एमयूटीपी-२) अंतर्गत हार्बर मार्गावरील लोकलचा विस्तार गोरेगावपर्यंत करण्यासाठी १०३ कोटी रुपयांचा प्रस्ताव होता. अंधेरी ते गोरेगाव दरम्यानच्या रेल्वे रुळांच्या विस्ताराचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे (एमआरव्हीसी) करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे एक लाख प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. तसेच दादर आणि अंधेरी या दोन स्थानकांवरील प्रवाशांचा भार देखील कमी होण्यास मदत होणार आहे. सध्याच्या परिस्थितीत पश्चिम रेल्वेच्या ३७ तर मध्य रेल्वेच्या ५२ लोकलच्या फेऱ्या हार्बर मार्गावरील अंधेरी स्थानकापर्यंत चालवल्या जातात. हार्बर मार्गावरून बोरिवलीपर्यंत रेल्वे सेवा सुरु केल्यावर पहिल्या टप्प्यात २३ लोकल गोरेगावपर्यंत थेट चालवण्यात येणार आहेत. यामध्ये १८ लोकल पनवेल-अंधेरी तर ५ लोकल सीएसएमटी ते अंधेरी असणार आहेत.

Post Top Ad

test