Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

हेड सिटी स्कॅनर खरेदीचा प्रस्ताव परत पाठवला .


मुंबई - मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील न्यूरोसर्जरी विभागासाठी पोर्टेबल हेड सिटी स्कॅनर खरेदी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. मात्र २०१६ ला निविदा मागवूनही प्रशासनाने विलंबाने हा प्रस्ताव स्थायी समितीपुढे आणल्याने तसेच यात त्रुटी असल्याचे सांगून स्थायी समिती सदस्यांनी सदर प्रस्ताव फेरविचारासाठी प्रशासनाकडे परत पाठवला.

पोर्टेबल हेड सिटी स्कॅनर फॉर न्यूरोसर्जरी या यंत्राचा वापर रुग्णांच्या डोक्याचे फोटो इमेजिंग करुन रोग निदान करण्यासाठी न्यूरोसर्जरी विभागात केला जातो.पालिकेच्या केईम रुग्णालयातील न्यूरोसर्जरी विभागासाठी पालिकेने पोर्टेबल हेड सिटी स्कॅनर खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी ७ कोटी ८४ लाख ९९ हजार २०० रुपये खर्च केला जाणार आहे. तर देखभाल करण्यासाठी दोन कोटी रुपये देण्यात येणार आहेत असे एकूण ९ कोटी ८५ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव आज प्रशासनाने स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला.मात्र विलंबाने आणलेल्या या प्रस्तावावर सदस्यांनी आक्षेप घेतला.२०१६ मध्ये याबाबत निविदा मागवली .आणि प्रशासनाने २०१८ मध्ये हा प्रस्ताव मंजुरीसाठी आणला.२०१७ मध्ये निविदा उघडली तेव्हा डॉलरचा दर ६८.७४ इतका होता. आजचा डॉलरचा रेट काय आहे ?असा सवाल भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी केला .तसेच १ जुलै २०१७ पासून जीएसटीही लागू झाल्याने याची किंमत वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले .हा प्रस्ताव आणायला एवढा वेळ का लागला ?असा प्रश्न उपस्थित करून याबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे विरोधी पक्षनेते रावीराजा यांनी सांगितले.तर २०१६ ला निविदा प्राप्त होऊनही यासाठी एक वर्ष का लागले? ३ निविदा प्राप्त होणे गरजेचे असतानाही एकच निविदा का आली? याचा प्रशासनाने खुलासा करावा ,अशी मागणी सभागृह नेते यशवंत जाधव यांनी केली. तसेच हा प्रस्ताव अपूर्ण व चुकीचा असून तो फेरविचारासाठी प्रशासनाकडे परत पाठवावा असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या प्रस्तावात त्रुटी असल्याचे सांगून स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी सदर प्रस्ताव परत पाठवला.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom