13 रुपयांत क्षयरोग रुग्णालय कर्मचा-यांना सकस आहार कसा - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

08 February 2018

13 रुपयांत क्षयरोग रुग्णालय कर्मचा-यांना सकस आहार कसा


नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर -
मुंबई | प्रतिनिधी -
पालिकेच्या शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयातल्या कर्मचाऱ्याना 13 रुपयांत सकस आहार दिला जाणार असल्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी आला होता. यावर नगरसेवकांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरत 13 रुपयांत कसला सकस आहार दिला जाणार आहे असा प्रश्न उपस्थित केला. या रुग्णालयातील कर्मचारी, डॉक्टर आपल्या जीवाची परवा न करता रुग्णांची सेवा करत असल्याने प्रत्येक कर्मचा-याला सकस आहारासाठी किमान 50 रुपये तरी देण्यात यावेत अशी मागणी लावून धरण्यात आली. नगरसेवकांच्या या मागणीचा विचार केला जाईल, असे आश्वासन यावेळी प्रशासनाच्यावतीने देण्यात आले.

क्षयरोग कर्मचा-यांना सकस आहार पुरविण्यासाठी नवीन खाजगी संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे. पालिकेने या कामासाठी या संस्थेला १.७४ कोटींचे कंत्राट दिले आहे. मात्र प्रत्येक कर्मचा-याला सकस आहारासाठी 13 रुपये खर्च केले जाणार असल्याचे प्रशासनाने प्रस्तावात नमूद करण्यात आल्याने नगरसेवकांनी यावर प्रशासनाला धारेवर धरले. सकस, पौष्टिक अशी नावे आहाराला दिल्याने बरं वाटते. मात्र हा सकस आहार फक्त प्रत्येक कामगारांला 13 रुपयांत देण्यात येणार आहे. 13 रुपयांत सद्यस्थितीत कोणता सकस आहार मिळणार याबाबत प्रशासनाने स्पष्टीकरण करावे, असे शिवसेनेचे नगरसेवक मंगेश सातमकर यांनी सांगितले. मात्र प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने 50 रुपये सकस आहारासाठी मिळावेत अशी मागणीही सातमकर व इतर नगरसेवकांनी केली.

क्षयरोग रुग्णालयात कार्यरत असलेले कामगार, कर्मचारी, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी अनेकवेळा क्षयरोग बाधित रुग्णांच्या सहवासात येतात. यावेळी रुग्णांकडून खोकल्याद्वारे संक्रमण होत असल्याने या संसर्गजन्य रोगाची त्यांना बाधा होण्याची शक्यता असते. कर्मचाऱ्याना बाधा होऊ नये तसेच त्यांची प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी २०१२ पासून पालिकेतर्फे सकस आहार पुरविण्यात येत आहे. यासाठी महालक्ष्मी स्वयं सहाय्यता महिला मंडळ या संस्थेला कंत्राट देण्यात आले होते. सदर संस्था १६.७४ रुपये या दराने प्रति कर्मचारी सकस आहार पुरवत होती. हा आहार पुरविण्यासाठी सदर संस्थेला यापूर्वी अनेकदा मुदतवाढ देण्यात आली. मात्र २०१७ मध्ये या संस्थेचा कंत्राट कालावधी संपुष्टात आला .त्यामुळे पालिकेने एक हजार कर्मचाऱ्याना हा आहार पुरविण्यासाठी मे. वनिता कॅटरर्स या संस्थेची निवड केली आहे. ही संस्था १३.८० रुपये दराने हा आहार पुरवणार आहे. त्यासाठी पालिकेने दोन वर्षासाठी १ कोटी ७४ लाखांचे कंत्राट दिले आहे. दरम्यान आहारासाठी 50 रुपये करावेत, या मागणीबाबत विचार केला जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले.

13 रुपयांत देण्यात येणार सकस आहार --
शाकाहारी -- पनीर पराठा , केळे, सोया पोहे ,सोया कटलेट, चण्याचे कटलेट, दूध ,शाकाहारी चीज सँडविच, इटली सांबर, उत्तप्पा, ढोकळा, गुलपोळी, टोमॅटो ऑम्लेट, मोड आलेल्या कडधान्याचे चाट..
मांसाहारी -- ब्रेडसहित अंडा बुर्जी, उकडलेल्या अंड्याचे सॅण्डव्हीच, ऑम्लेट पाव, उकड..

Post Top Ad

test