एकाच कंत्राटदारावर पालिका प्रशासन मेहरबान - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 February 2018

एकाच कंत्राटदारावर पालिका प्रशासन मेहरबान

मुंबई - महापालिका अधिकाऱ्यांसाठी कोट्यावधी रुपये खर्च करुन जिमखाना बांधण्याचे कंत्राट ज्या कंत्राटदाराला दिले त्याच कंत्राटदाराला छोट्या रस्त्यांची कामे देणे म्हणजे पालिका प्रशासन या कंत्राटदारावर मेहरबान असल्याचा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्थायी समितित केला. 

मुंबईतील छोटा रस्त्यांची कामे करण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितिच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. यावेळी पालिका प्रशासनाला एकच कंत्राटदार सर्व कामांसाठी कसा भेटतो ? महापालिका अधिकाऱ्यांसाठी जिमखाना बांधण्यासाठी आणि रस्त्यांच्या कामासाठी एकच कंत्राटदार का ? ज्या कंत्राटदाराचे काम योग्य नसल्याने व जादा पैसे आकारात असल्याने कंत्राट रद्द करण्यात आले होते. त्याच कंत्राटदाराला छोट्या रस्त्यांची कामे देण्यामागे प्रशासनाचा उद्देश्य काय ? असे प्रश्न उपस्थित करत प्रस्ताव रद्द करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. त्यावर सदर कंत्राटदाराने रस्त्यांच्या कामासाठी कमी दराने निविदा भरल्याने त्या कंत्राटदाराला कंत्राट देण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी सांगितले.

Post Bottom Ad