विधिमंडळ सदस्यांच्या कॅशलेस मेडिकल योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

08 February 2018

विधिमंडळ सदस्यांच्या कॅशलेस मेडिकल योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई - महाराष्ट्र विधानमंडळाच्या विद्यमान व माजी सदस्य तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांना रोकडरहित आरोग्य विमा योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आला.

विधानभवनाच्या समिती कक्षात हा कार्यक्रम झाला. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे,विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या योजनेच्या प्रमाणपत्राचे प्रकाशन करण्यात आले.

१ फेब्रुवारी २०१८ पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित असलेल्या विधिमंडळातील सदस्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमा कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार अजित पवार, सुनील तटकरे, नीलम गोऱ्हे, अनिल परब, संजय दत्त, सुनील प्रभू,राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक, विधानमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे उपस्थित होते.

Post Top Ad

test