Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

"एनडीआरएफ"च्या धर्तीवर मुंबईत "सीडीआरएफ" दलाची स्थापना


मुंबई । प्रतिनिधी -
देशात कोणत्याही प्रकारची "नैसर्गिक आपत्ती आल्यास किंवा संकट निर्माण झाल्यास राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) धावून येते. मुंबईतही पावसाळ्यादरम्यान, इमारत कोसळल्यावर एनडीआरएफची मदत घेतली जाते. "एनडीआरएफ" दल हे केंद्र सरकारचे असल्याने देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसाठी स्वतंत्र शहर आपत्ती निवारण दल (सीडीआरएफ) स्थापन करण्यात येणार आहे. "सीडीआरएफ" स्थापन झाल्यास मुंबई हे देशातलं असं दल स्थापन करणारं पहिलं शहर ठरणार आहे. 

देशाची आर्थिक राजधानी व जागतिक दर्जाचे शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. मुंबईत पावसाळ्यादरम्यान अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडतात. कधी कधी तर मुंबईमध्ये पूरस्थिती निर्माण होतो. कित्तेकवेळा मुंबईत इमारती कोसळून ढिगाऱ्याखाली अनेक लोक त्याखाली अडकतात. अशावेळी मुंबई अग्निशमन दल, पोलीस यांच्या मदतीला "एनडीआरएफ" पाचारण केले जाते. आपत्कालीन परिस्थितीमध्ये वेळोवेळी "एनडीआरएफ" व मुंबई अग्निशमन दल आपले काम चोख बजावत असते. "एनडीआरएफ" हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याने आपत्कालीन परिस्थितीमध्ये मुंबई महापालिकेचे स्वतःचे असे दल असल्यास त्वरित मदत पोहचवता यावी म्हणून शहर आपत्ती निवारण दल (सीडीआरएफ) स्थापन करण्यात येणार आहे.

"सीडीआरएफ"च्या टीममध्ये २०० जवानांचा समावेश करण्यात आला आहे. या जवानांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये आग आणि पूरग्रस्त स्थितीतून नागरिकांची मदत कशी करता येईल, त्यांना सुविधा कशा पुरवता येतील, याचं प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच अणूहल्ला किंवा जैविक हल्ल्याच्या वेळेस काय उपाययोजना करण्यात यावा, याचंही प्रशिक्षण देण्यात येण्यात येणार अाहे. "सीडीआरएफ"मध्ये मुंबई महापालिकेने सुरक्षा विभागातील ३० पेक्षा कमी वयाच्या ग्रॅज्युएट झालेल्या तरूणांची निवड केली आहे."सीडीआरएफ"च्या जवानांना १२ फेब्रुवारीपासून "एनडीआरएफ"च्या अधिकाऱ्यांकडून मुंबईतच प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom