Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

दुष्काळावर मात करण्यासाठी बांधणार पुल बंधारे - नितीन गडकरी


- 167 पुल बंधाऱ्यातून 50 हजार हेक्टर सिंचन निर्मीती
मुंबई - दुष्काळावर मात करण्याचा एक वेगळा उपाय म्हणून राज्यातल्या राष्ट्रीय महामार्गावर पूल वजा बंधारे बांधण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे . विदर्भात 41 मराठवाड्यात 98 , पुण्यात 11, नाशिकमध्ये 17 असे एकूण 167 बंधारे वजा पूल बांधण्यात येणार असून त्यामुळे दुष्काळी भागाचा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटण्यास मदत होईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात बोलताना दिली. 

तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी सातत्याने जल संवर्धनाचा आग्रह धरल्यामुळेच त्यांच्या काळात अमरावतीमध्ये पहिला पूल वजा बंधारा प्रकल्प उभा राहू शकला. अमरावतीमधील पाण्याचा प्रश्न सोडवणारा हा पूल म्हणजे जलसंवर्धन क्षेत्रात महाराष्ट्राला मिळालेली एक प्रकारे देणगी आहे. त्यावरूनच प्रेरणा घेऊन हा प्रकल्प उभारण्याचा विचार केला. अशाच प्रकारचे बंधारे अगोदर बांधल्या गेले असते तर दुष्काळात लातूरला रेल्वेने पाणी देण्याची वेळ आली नसती अशी खंतही गडकरी यांनी व्यक्त केली

या प्रकल्पामुळे 50 हजार हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. सतत पाणी बंधाऱ्यात राहिल्यामुळे जल संवर्धनाला मोठ्या प्रमाणावर हातभार लागण्यास मदत होऊ शकेल.त्याच प्रमाणे आसपास क्षेत्रातही पाणी उपलब्ध होण्यास मदत होऊ शकेल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून काम करत असताना या राज्याचा अधिक विकास व्हावा म्हणून राज्यात पाच लाख कोटी रुपयांची कामे करण्याचा संकल्प केला होता त्यातील राष्ट्रीय महामार्ग, जलस्रोत, नदीजोड, बंदरे विकास आदी कामावर आत्तापर्यंत 2 लाख 80 हजार कोटींहून अधिक रुपयांही कामे झाली आहेत. येत्या वर्षभरात पाच लाख कोटी रुपयांहुन अधिक रुपयांची कामे करण्याचा आपला मानस असल्याचेही गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले. 2014 पूर्वी राज्यात 5 हजार 700 किमी महामार्गचे रस्ते होते, आम्ही मागील चार वर्षांत 16 हजार 636 किमी रस्ते वाढवले असल्याचा दावाही त्यांनी केला.

मुंबई आणि तिच्या विकासावरही गडकरी यांनी अनेक प्रकल्पाची माहिती दिली. मुंबईतील मिठी नदीच्या दुरावस्थेबद्दल गडकरी खंत व्यक्त करत ती शुद्ध व्हावी यासाठी महापालिका आणि राज्य सरकारने मिठीच्या शुद्धीकरणावर काम करावे अशी सूचना केली.

मुंबई आणि तिच्या विकासावरही गडकरी यांनी अनेक प्रकल्पाची माहिती दिली. मुंबईतील मिठी नदीच्या दुरावस्थेबद्दल गडकरी खंत व्यक्त करत ती शुद्ध व्हावी यासाठी महापालिका आणि राज्य सरकारने मिठीच्या शुद्धीकारणावर काम करावे अशी असे सांगितले.

मुंबईत 900 क्रूझ मुंबई गोवा सागरी महामार्गासाठी येतील अशी आपली कल्पना असून त्यासाठी एप्रिलपर्यंत काम सुरू होणार आहे. तर ठाणे ते वसई सागरी मार्गासाठी आपल्याकडे 600 कोटी रुपयांचा प्रस्ताव आला असून त्यासाठीचा लवकरच करार करण्यात येणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

मुंबईकरांना चांगला ऑक्सिजन मिळावा यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट च्या 850 एकर जागेवर सुंदर उद्यान उभारण्यासाठी आपण एक प्रस्ताव दिला असल्याचेही त्यांनी सांगितले. देशाला यशस्वी नेतृत्व देण्याची ताकद ही महाराष्ट्राच्या मातीत आहे. येथील साहित्य, कला, महापुरुषांचे विचार यातून देशाला सतत प्रेरणा मिळत असल्याचेही गडकरी म्हणाले

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom