Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सदस्यांना मार्चपासून पेन्शन


मुंबई । प्रतिनिधी - 65 वर्षांच्या वरील सेवानिवृत्त आणि गरजू सदस्यांना मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने मार्च, 2018 पासून दरमहा 1200 रुपये पेन्शन सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी केली.

अल्प पगारावर पत्रकारिता करून निवृत्त झालेले अनेक ज्येष्ठ पत्रकार आजही पेन्शनपासून वंचित आहेत. अनेकांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. त्यात वाढत्या वयाबरोबर जडणारे आजार आणि औषधोपचारांसाठी येणारा खर्च यामुळे अनेक ज्येष्ठ पत्रकार हवालदिल झालेले दिसतात. या पार्श्वभूमीवर मुंबई मराठी पत्रकार संघाच्या 65 वर्षांवरील सर्व सेवानिवृत्त आणि गरजू सदस्यांना मार्चपासून पेन्शन देण्यात येईल, असे वाबळे यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी संघाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना पेन्शन वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचे आमंत्रण दिले होते. मुख्यमंत्र्यांनी ते स्वीकारले असून शिष्टमंडळाच्या विनंतीनुसार मार्च महिन्यात सदर कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आपला बहुमुल्य वेळ देणार आहेत, अशी माहिती देखील वाबळे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. भविष्यात पेन्शनच्या रकमेत घसघशीत वाढ करण्याच्या दृष्टीने मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे निधीसंकलन करण्यात येईल, असेही वाबळे यांनी पत्रकात म्हटले आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom