परिवहन मंत्र्यांच्या उपस्थितीत पत्रकारांना धक्काबुक्की - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

15 February 2018

परिवहन मंत्र्यांच्या उपस्थितीत पत्रकारांना धक्काबुक्की


मुंबई - मुंबई सेंट्रल एसटी स्थानकात परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशिनचे उद्घाटन अभिनेता अक्षय कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की करण्यात आल्याने इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधींच्या कॅमेरा साहित्याचेही नुकसान झाले.

एसटीने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशिन कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. मुंबई सेंट्रल येथील शौचालयाच्या मुख्यभागी हे वेडिंग मशिन कार्यरत करण्यात आले. अवघ्या २० रुपयांत ३ सॅनिटरी नॅपकिनचे पाकीट या स्वयंचलित यंत्रातून मिळेल. पाच रुपयांच्या चार कॉइन किंवा दहा रुपयांचे दोन कॉइन या यंत्रात टाकल्यानंतर सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होतील. राज्यातील अजून १० बसस्थानकांवर लवकरच अशी सॅनिटरी नॅपकिनची स्वयंचलित यंत्रे बसविण्यात येणार आहेत. सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशिनचे उद्घाटन अभिनेता अक्षय कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. स्थानकातील निमुळत्या जागी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यकर्ते, चाहते, एसटी कर्मचारी-अधिकारी आणि प्रवासी यांनी गर्दी केली होती. अभिनेता अक्षय कुमारची प्रतिक्रिया घेण्यासाठी महिला पत्रकारांसह छायाचित्रकारही उपस्थित होते. यावेळी कार्यकर्ते फुलांचे गुच्छ घेऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी पुढे जाताना पत्रकार छायाचित्रकारांना धक्काबुक्की केली. यात इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधींच्या कॅमेरा साहित्याचेही नुकसान झाले. परिणामी, अक्षय कुमारसह मंत्री रावते आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे उपस्थितांशी एकही शब्द न बोलता कार्यक्रमातून निघून गेले. 

Post Top Ad

test