व्हॅलेंटाईन डे निमित्त मुंबईत प्रथमच रंगणार उर्वशीच्या जीवनावरील नृत्य नाटिका - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

13 February 2018

व्हॅलेंटाईन डे निमित्त मुंबईत प्रथमच रंगणार उर्वशीच्या जीवनावरील नृत्य नाटिका


मुंबई । प्रतिनिधी -
मुंबईकर रसिक प्रेमींना, शास्त्रीय व विविध शैलीतील नृत्य आणि संगीताद्वारे उर्वशी व राजा पुरूरव यांच्या प्रेम कथेवर आधारित प्रथमच एक नवीन आणि उच्च दर्जाच्या कार्यक्रमाचा आनंद लुटता येणार आहे. ‘उर्वशी: सेलिब्रेशन ऑफ लव्ह अँड वूमनहुड’ या कार्यक्रमाचे आयोजन ‘मंत्रा विजन प्रा.लि’ यांनी दि.१६ व १७ फेब्रुवारी २०१८ रोजी सायंकाळी ७ वाजता, रविंद्र नाट्य मंदिर, दादर येथे केले आहे.

हा कार्यक्रम एक उत्तम संगीत, नृत्य आणि नाट्य याचा एक मिलाप असून त्याला रंगमंचावर पाहून रसिकांच्या डोळ्याचे अक्षरशः पारणे फिटेल. या कार्यक्रमाचे कथानक कालिदासाच्या ‘विक्रमोर्वशीयम्’ मधील अप्सरा उर्वशी आणि राजा पुरुरवा यांच्या प्रचलित अशा कथेवर आधारित आहे. हे नाटक स्त्रीच्या अधिकाराची, सत्वाची, आत्मनिर्भरतेची, असीम क्षमतेची, प्रेमाची आणि सक्षतेची छबी चित्रित करते. तसेच पुरुष वर्गाला स्त्री बद्दलची विचारसरणी बदलण्यास, तिला सशक्त व स्वतंत्र बनण्यास व प्रयत्न करण्याची दृष्टी देते. त्याच बरोबर तिच्यावर बंधन न लादता, तिच्या अस्तीत्वासाठी, अधिकारांसाठी मदत करण्याची वृत्ती व तिला योग्य सन्मान देण्यास प्रवृत्त करते. या नाटकाद्वारे आजच्या पिढीला भारतीय संस्कृती, कला, साहित्य ह्यांची ओळख करून दिली जाणार आहे. या नृत्य नाट्यातील उर्वशीचे पात्र अत्यंत जिवंत पणे मंदिरा मनीष या सादर करत आहे. या वयाच्या दहाव्या वर्षा पासून भारत नाट्यमय करत असून यांनी देश विदेशात अनेक ठिकाणी आपली नृत्यकला सदर केलेली आहे. या बरोबरच पूर्वा सारस्वत व सोनाली सुर्वे- गावडे यांनी अनुक्रमे मेनका आणि रंभा हि पत्रे साकारली आहे. तसेच राजा पुरूरव यांचे पात्र वृशांक रघटाटे हे साकारणार आहेत. प्रसिध्द संगीतकार अलाप देसाई यांनी याला उत्तम असे संगीत दिलेले आहे. अलाप यांनी संगीतात विविध प्रकारच्या शैलीचा वापर करून, त्यांच्या अनुभवाच्या जोरावर उर्वशीला सुंदररित्या साकारले आहे. हे नृत्यदिग्दर्शन वैभव आरेकर यांनी केले असून याचे दिग्दर्शन सुशांत जाधव यांनी केलेले आहे. या कार्यक्रमात नृत्य आणि संगीताच्या आधारावर उर्वशीचा एक सुंदर जीवन प्रवास रेखाटला गेला आहे.

Post Top Ad

test