Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

फुकट्या प्रवाशांच्या माध्यमातून पश्चिम रेल्वेच्या उत्पन्नात वाढ


मुंबई । प्रतिनिधी - पश्चिम रेल्वेचे प्रमुख मुख्य वाणिज्य व्यवस्थापक राजकुमार लाल यांच्या मार्गदर्शनाखाली फेब्रुवारी, 2018 च्या सुरुवातीच्या 18 दिवसात तिकिट तपासणीदरम्यान कारवाई करताना मिळालेल्या उत्पन्नात 28 टक्के वाढ झाली असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी दिली आहे.

पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार विभागीय रेल्वेने तिकिट तपासणीत मागील महिन्यात याच जालावधीत 3.80 कोटी रुपये दंड वसूल केला होता. फेब्रुवारी महिन्यात करण्यात आलेल्या कारवाईत 27.71 टक्के इतकी वाढ झाली असून 4.86 कोटी रुपये इतका महसूल प्राप्त केला आहे. त्याचप्रमाणे प्रमुख मुख्य वाणिज्य व्यवस्थापकाच्या भरारी पथकाने फेब्रुवारी, 2018 च्या सुरुवातीच्या 18 दिवसात तिकिट तपासणीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 108 टक्के (दुप्पट वाढ) वाढ झाली आहे. पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक ए. के गुप्ता यांनी या उत्कृष्ट कामगिरीबाबत तिकीट चेकिंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली आहे, तर प्रमुख मुख्य वाणिज्य व्यवस्थापक लाल यांनी सर्व विभागातील वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांना प्रशंसा पत्र लिहिले आहे. तसेच पश्चिम रेल्वेच्या उत्पन्नात वाढ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देण्याचे जाहिर केले आहे.

जानेवारीत ७ कोटींचा दंड वसूल - 
जानेवारी महिन्यात ७ कोटींचा दंड वसूल केला आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात १ लाख ९२ गुन्ह्यांती नोंद करण्यात आली आहे. याशिवाय ११४७ भिकारी आणि अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ८५ जणांना तुरुंगात टाकण्यात आलं. १२ वर्षांवरील ८७ शालेय मुलांना महिला डब्ब्यात प्रवास करताना पकडलं आहे. शिवाय, तिकीट दलालांविरोधातही पश्चिम रेल्वेने कारवाई करत २२൦ व्यक्तींवर कारवाई केली आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom