अनधिकृत गोदामे महापालिकेच्या रडारवर - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

12 February 2018

अनधिकृत गोदामे महापालिकेच्या रडारवर


मुंबई । प्रतिनिधी -
कमला मिल येथील आगी नंतर मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई सुरु केली आहे. याच दरम्यान मानखुर्द- मंडाला येथील गोदामाला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर पालिकेने अनधिकृत गोदामांकडे आपला मोर्चा वळवला आहे. आगीला कारणीभूत ठरणारी गोदामे आता पालिकेच्या रडारवर आली असून अशा अनधिकृत गोदामांवर तोडकी कारवाई केली जाणार आहे.

कमला मिल कंपाऊंडमधील आग दुर्घटनेनंतर पालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा धडाका सुरु केला आहे. या कारवाईत अनेक ठिकाणी अग्नी सुरक्षेचा नियम धाब्यावर बसवल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. वसाहती जवळपास बेकायदा बांधकामे करून त्यात भंगाराची गोदामे उभी अनेक वसाहती जवऴपास उभी राहीली आहेत. या गोदामात विविध प्रकाराचे भंगारांचा साठा करण्यात येतो. यांत ज्वलनशील रासायनिक द्रव्यही ठेवले जात असल्याने आगीच्या घटना वाढत आहेत. रविवारी मानखुर्द -मंडाला येथील लागलेल्या भीषण आगीत भंगाराचे गोदाम जळून खाक झाले. या गोदामाच्या ठिकाणी प्लास्टिक ड्रम, पॅकिंग सामग्री, स्टॉकचा साठा, बिस्लेरी बाटल्या, विद्युत वायरिंग, प्लायवुड, लाकडी फर्निचर, स्क्रॅप वायरिंग, रसायनांचा साठा, लाकडी आणि जीआय शीटस, चिंध्या, सुमारे 50-60 गॅलन्स आदीचा साठा करून ठेवल्याचे समोर आले. येथे ज्वलनशील पदार्थांचा साठा तसेच अनधिकृत बांधकाम व वीज जोडणी पुरवठाही बेकायदेशीर केला जात होता. याप्रकरणी तक्रार दाखल करण्याचे निर्देश सहायक आयुक्ताने दिले आहेत. मात्र अशा प्रकारची भंगाराची अनधिकृत गोदामे मुंबईत बहुतांशी ठिकाणी उभी आहेत. मानखुर्दला यापूर्वीही याच परिसरात अग्नितांडव झाले होते. मात्र पालिकेने ठोस कारवाई केली नसल्याने असे अनधिकृत व्यवसाय उभे राहत असल्याच्या प्रतिक्रिया येथील रहिवाशांच्या आहेत. मुंबईत वसाहती जवळपास अशी अनधिकृतपणे गोदामे उभारण्यात आली आहेत. विशेषतः कुर्ला, वांद्रे, धारावी, रेरोड, अंधेरी आदी ठिकाणी गोदामे अनधिकृतपणे उभी आहेत. काही महिन्यांपूर्वी रे रोड येथील अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या गोदामाला भीषण आग लागून त्यात गोदाम जळून खाक झाले होते. अशी गोदामे उभी करून त्यात ज्वलनशील पदार्थांचा साठा केला जात असल्याने थोडी ठिणगी पडली तरी आगीचा वणवा पसरतो. रविवारच्या मानखुर्दच्या दुर्घटनेनंतर पालिकेने आता अशा भंगारांच्या गोदामांकडे लक्ष वेधले असून लवकरच या अनधिकृत गोदामांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

Post Top Ad

test