विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबरोबर, शाळा डिजिटलीकरणाला प्राधान्य - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

02 February 2018

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबरोबर, शाळा डिजिटलीकरणाला प्राधान्य


पालिकेच्या शाळांचे खाजगीकरण -
मुंबई । अजेयकुमार जाधव -

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याबरोबरच शाळांचे डिजिटलीकरण करण्याकडे लक्ष देंण्यात आले आहे. महापालिकेच्या ३८१ शाळांमध्ये ४ हजार ६४ सीसीटीव्ही लावण्यात येणार असून १३०० वर्गखोल्यांमध्ये डिजिटल क्लासरूम उभारण्यासाठी ३७ कोटी ३८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याचबरोबर पालिकेच्या ३५ शाळा खाजगी लोक सहभाग तत्वावर सुरु केल्या जाणार आहे तसेच आंतराष्ट्रीय दर्जाच्या २४ शाळा सुरु केल्या जाणार आहे त्यासाठी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याची घोषणा अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी केली.

महापालिकेच्या शिक्षण विभागाचा सन २०१८ -१९ चा अर्थसंकल्प जऱ्हाड यांनी शिक्षण समितीत अध्यक्षा शुभदा गुडेकर यांना सादर केला. शिक्षण विभागाचा मागील वर्षाचा (सन २०१७ - १८ चा) अर्थसंकल्प २३११ कोटी ६६ लाखांचा सादर करण्यात आला होता. सन २०१८ -१९ चा अर्थसंकल्प २५६९ कोटी ३५ लाख रुपयांचा सादर करण्यात आला. मागील वर्षापेक्षा २०१८ - १९ च्या अर्थसंकल्पात २५७ कोटी ६९ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. २०१८ - १९ च्या अर्थसंकल्पात विद्यार्थिनींसाठी शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिन्स लावले जाणार त्यासाठी २ कोटी ५० लाख रुपयांची, शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून सुका मेवा देण्यासाठी २७ कोटी ३८ लाख रुपयांची, पालिकेच्या शाळांमधील ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्यासाठी व त्याचे परिरक्षण करण्यासाठी १८ कोटी रुपयांची, शालेय इमारतींची दुरुस्ती दर्जोन्नती व पुनर्बांधणीसाठी २७ कोटी ६७ लाख रुपयांची, इंग्रजी शाळांची मागणी लक्षात घेता ६४९ शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या मातृभाषेबरोबर इंग्रजी भाषेतून शिक्षण दिले जाणार आहे. पालिकेच्या २५ इ लायब्ररी सुरु केल्या जाणार आहेत त्यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य प्रभावी होण्यासाठी अक्षरशिल्प प्रकल्प राबविला जाणार आहेत. उर्दू शाळांमध्ये शिक्षक भरती केली जाणार आहे. अनुदान तत्वावर चालवण्यात येणा-या दोन उर्दू अध्यापक विद्यालयांमध्ये अधिव्याख्याता संवर्गातील (डीएड) १४ पदे व अर्धवेळ शिक्षकांची १० पदे भरली जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी अक्षरशिल्प प्रकल्प सुरु केले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरात सुधारणा होईल व त्यांच्या वर्तणूक व व्यक्तीमत्व बदल होईल असे पालिकेने अर्थसंकल्पात म्हटले आहे. विद्यार्थ्यांना जर्मनीचा फूटबॅाल अभ्यासक्रम शिकवण्यासाठी फूटबॉल क्लब ऑफ इंडिया आणि मुंबई जिल्हा असोसिएशन फूटबॉल नेक्स्ट फाऊंडेशनच्या सहकार्याने रोड टू जर्मनी उपक्रम राबवला जाणार आहे. यातून गुणवंत फूटबॉल खेळाडूंची निवड करून त्यांना थेट जर्मनीला पाठवण्यात येणार आहे. तसेच पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना बेस्ट बसने मोफत प्रवास करता यावा यासाठी तब्बल ६५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. शाळांमध्ये केंद्रीय ध्वनिक्षेपक यंत्रणा लावण्यासाठी ७४ कोटी ८३ लाख रुपयांची, तर २६२ शाळांमध्ये कॉम्युटर लॅब उभारण्यासाठी ८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ३९६ नव्या बालवाड्या सुरु करण्यात येणार आहेत त्यासाठी प्रत्येक बालवाडी १० रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी १३ कोटी ३७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या आदेशाने विद्यार्थिनीसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचावा लेक शिकवा अभियान राबविले जाणार आहे त्यासाठी १ कोटी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जुन्या ४८० व नव्या २०२ अश्या एकूण ६८२ शाळांमध्ये व्हर्चुअल क्लासरूमसाठी १६ कोटी ९२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शालेय वस्तूंचा मोफत पुरवठा करता यावा म्हणून १२३ कोटी ११ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

शिक्षण विभागासाठीच्या तरतूदी - 
-- १३०० डिजिटल क्लासरूम -- ३७. ३८ कोटी
-- विद्यार्थ्याना टॅब वाटपासाठी -- १८ कोटी
-- व्हर्चुअल क्लासरूमसाठी -- १६ कोटी ९२ लाख
-- बेस्ट बसने मोफत प्रवास -- ६५ कोटी
-- विद्यार्थ्याना पोषण आहार (सुका मेवा) - २७.३८ कोटी
-- शाळेत ४०६४ सीसीटिव्ही कॅमेरे -- ५ कोटी
-- शालेय वस्तूंचा मोफत पुरवठा -- १२३ कोटी
-- २४ आंतरराष्ट्रीय शाळा -- २५ लाख
-- सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन -- २.५० कोटी
-- पालिकेच्या २५ ग्रंथालयात ई लायब्ररी -- १ कोटी
-- शालेय इमारतींची दुरुस्ती व पुनर्बांधणी -- २७७ कोटी

Post Top Ad

test
test