Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना कॅनव्हॉसचे बूट


मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना २७ वस्तू मोफत दिल्या जातात. आता पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेशासह कॅनव्हॉसचे बूट दिले जाणार आहेत. तसा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

महापालिकेच्या शाळांमधील गळतीचे प्रमाण मोठे आहे. शाळांमधील गळतीचे प्रमाण कमी करता यावे म्हणून २७ शालेय वस्तू मोफत दिल्या जातात. विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेत पौष्टिक आहार दिला जातो. पालिका शाळांमधील विद्यार्थ्याना खेळाची आवड व्हावी म्हणून आठवड्यातून एक दिवस रंगबिरंगी युनिफॉर्म व कॅनव्हॉसचे बूट दिले जाणार आहेत. शारीरिक शिक्षणाच्या तासात खेळाकरता सव्वा तीन लाख मुलांसाठी शूजची खरेदी केली जात आहे. यासाठी २३२ रुपयांमध्ये कॅनव्हॉसच्या शूजची खरेदी केली जात असून यासाठी साडे सात कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. पालिकेकडे सुप्रसिद्ध बाटा कंपनीने निविदा भरली होती मात्र बाटाचे सॅम्पल महापालिकेच्या प्रयोगशाळेतील चाचणीत बाद ठरले. गुणिना कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पात्र ठरल्याने या कंपनीला बूटांचे कंत्राट दिले जाणार आहे. स्थायी समितीच्या मंजुरीसाठी तसा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. स्थायी समिती व पालिका सभागृहाच्या मंजुरीनंतर इयत्ता १ ली ते ४थीच्या विद्यार्थ्यांना १ लाख ४७ हजार ४९०, इयत्ता ५वी ते ८वीच्या विद्यार्थ्यांना १ लाख ४८ हजार ४४४, इयत्ता ९ वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांना २७ हजार ९६५ कॅनव्हॉसच्या बुटांचे वाटप केले जाणार आहे. शाररिक शिक्षण तासासाठी लाल, निळा, पिवळा आणि हिरवा रंगाचे युनिफॉर्म विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत. त्याबाबतची प्रक्रिया पूर्ण झाली असून तोही प्रस्ताव लवकरच स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom