Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मध्य रेल्वे महिन्याभरात १४८ 'एटीव्हीएम' लावणार


मुंबई । प्रतिनिधी - रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीवर तिकिटांसाठी नेहमीच गर्दी असल्याने प्रवाशांना रांगा लावून तिकीट घ्यावे लागते. यामध्ये प्रवाशांचा वेळा वाया जात असल्याने तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी स्मार्ट कार्डवर आधारीत एटीव्हीएम मशिन बसवण्यात आल्या आहेत. आता आणखी ३२९ नव्या एटीव्हीएम मशिन बसवण्यात येणार आहेत. त्यातील १४८ एटीव्हीएम मशिन्स येत्या महिन्याभरात बसवण्यात येतील.

२००७ मध्ये एक्सेल कंपनीच्या एटीव्हीएम मशिन वापरात होत्या. या मशिनचं टच स्क्रीन लवकर खराब व्हायचं. त्यामुळे या मशिन वापरण्यास प्रवाशांना अडचणी यायच्या. पण, २०१२-१३ पासून फोर्ब्ज कंपनीच्या एटीव्हीएम मशिन घेण्यात आल्या. या मशिनवर सेवा पुरवण्यासाठी रेल्वेने निवृत्त कर्मचाऱ्यांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्त केलं आहे. त्यामुळे, ज्यांच्याकडे स्मार्ट कार्ड नसेल ते प्रवासीही इथून तिकीट विकत घेऊ शकतात. तिकीट खिडकीवरील रांगा कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या संपूर्ण डिव्हिजनमध्ये आणखी ३२९ नव्या एटीव्हीएम मशिन बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातील १४८ एटीव्हीएम मशिन्स येत्या महिन्याभरात बसवण्यात येणार आहेत. या मशिन वापरायला सोयीस्कर असणार आहेत. सध्या मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर ४२९ एटीव्हीएम मशिन बसवण्यात आलेल्या आहेत. त्यातील जवळपास १२९ मशिन्स जुन्या आहेत. त्यापैकी ६० ते ६५ मशिन्स अनेक कारणांनी बंद असतात. तर, ३०० मशिन्स नव्या आहेत. मध्य रेल्वेच्या एकूण तिकीट विक्रीत एटीव्हीएम मशिनमार्फत होणारी तिकीट विक्री सरासरी २७ टक्के इतकी आहे. तर काऊंटरवरून होणारी तिकीट विक्री सरासरी ५४ टक्के इतकी आहे. तर, जनसाधारण तिकीट बुकिंग सेवक (जेटीबीएस) एक रुपये अतिरिक्त मोजून तिकीट विकत घेणारे प्रवासी १८ टक्के आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून केवळ ५.४ टक्के तिकीट विक्री होते.

६९ कोटीव्हीएम मशिन -
रेल्वेकडून कॅश किंवा क्वॉईन टाकताच तिकीट देणाऱ्या एकूण ६९ क्वॉईन तिकीट व्हेंडर मशिन उपनगरीय मार्गावर बसवण्यात आल्या आहेत. ठाणे-कल्याणमध्ये प्रत्येकी ४, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस इथं प्रत्येकी ३ अशा एकूण ६९ मशिनचा समावेश आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom