छोटा सायन रुग्णालयातील 'स्वमग्न' मुलांसाठीच्या कक्षाला १ वर्ष पूर्ण - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

13 February 2018

छोटा सायन रुग्णालयातील 'स्वमग्न' मुलांसाठीच्या कक्षाला १ वर्ष पूर्ण


मुंबई । प्रतिनिधी -
स्वतःच्या जगात हरवून जाणा-या 'स्वमग्न' मुलांवर उपचार करण्यासाठी महापालिकेच्या पुढाकाराने आणि 'हाय-मिडिया लॅबॉरेटरिज प्रा. लि.' या कंपनीच्या सहकार्याने गेल्यावर्षी सुरु करण्यात आलेल्या विशेष कक्षाला (Autism Intervention Centre / AIC) नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. 'छोटा सायन हॉस्पिटल' या नावाने ओळखल्या जाणा-या धारावी परिसरातील नागरी आरोग्य केंद्रातील या कक्षाद्वारे स्वमग्न मुलांवर अल्प दरात उपचार करण्यात येतात, अशी माहिती लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालयातील बालरोग चिकित्सा विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. राधा गुलाटी-घिल्डीयाल यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना या प्रकल्पाच्या अधिकारी डॉ. मोना गजरे यांनी सांगितले की, स्वमग्न मुलांवर सुयोग्य उपचार केल्यास ते आत्मविश्वासासह अधिक चांगल्या पद्धतीने समाजात वावरु शकतात. भारतात सामान्यपणे ११० मुलांमागे एका मुलात स्वमग्नता आढळून येते. यावर बालरोगचिकित्सा, मनोविकारचिकित्सा व ऑक्युपेशनल थेरपी इत्यादींच्या माध्यमातून संयुक्तपणे करणे आवश्यक असते. 'हाय – मिडिया लेबॉरेटरीज प्रा. लि.' या कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून (CSR) प्राप्त देणगीतून छोटा सायं हॉस्पिटलमध्ये हे 'सेंटर' सुरु करण्यात आले आहे. शीव परिसरातील लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात (OPD) दर बुधवारी आणि शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १२ या कालावधीत नोंदणी केल्यावर या केंद्रात आवश्यकतेनुसार पाठविले जाते. अशी माहिती डॉ. मोना गजरे यांनी दिली. या कक्षामध्ये २ ते १६ वर्षे या वयोगटातील स्वमग्न मुलांवरील उपचारांच्या अनुषंगाने विविध अत्याधुनिक सामुग्री व खेळणी आहेत. वैद्यकीय चाचणीनुसार स्वमग्नतेच्या स्तराप्रमाणे प्रत्येक आठवड्यासाठी सत्र (Sessions) संख्या निर्धारित करुन उपचार करण्यात येतात. अत्यंत (Severe) स्वमग्नता असणा-या मुलांना ४ सत्र, सामान्य स्वमग्नता (Moderate) असणा-यांसाठी ३ सत्र; तर निम्नस्तरीय स्वमग्नता (Mild) असल्यास १ वा २ सत्र, याप्रमाणे उपचार करण्यात येतात. या कक्षात एका सत्राच्या उपचारासाठी रुपये २५०/- एवढे शुल्क आकारण्यात येते. तर दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींच्या मुलांना आणि महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना ही सेवा मोफत देण्यात येते. यानुसार या उपचार केंद्राद्वारे गेल्या वर्षभरात ४८ मुलांवर उपचार करण्यात आले आहेत. सध्या या केंद्रात ७५ स्वमग्न मुलांवर उपचार करण्यात येत आहेत. यासाठी 'लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय' येथील अधिष्ठाता डॉ. जयश्री मोंडकर यांच्या मार्गदर्शनात आणि 'हाय – मिडिया लेबॉरेटरीज प्रा. लि.'च्या श्रीमती सरोज वारके आणि डॉ. विशाल वारके यांच्या सहकार्याने हे केंद्र कार्यरत आहे. स्वमग्न मुलांवर उपचार करण्यासाठी या केंद्रामध्ये बालरोगचिकित्सा विभागातील प्रा. डॉ. राधा घिल्डीयाल, डॉ. मोना गजरे व ऑक्युपेशनल थेरपी विभागातील प्रा. डॉ. रश्मी एराडकर व डॉ. सुशांत सारंग आणि मनोरुग्णविकार विभागातील प्रा. डॉ. निलेश शहा, डॉ. अविनाश डिसूजा व डॉ. सागर कारिया हे प्रामुख्याने कार्यरत आहेतं.

Post Top Ad

test