पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसचे 'जनजागरण आंदोलन' - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

15 February 2018

पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसचे 'जनजागरण आंदोलन'


मुंबई - पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसतर्फे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील २१ प्रमुख रेल्वे स्थानकांबाहेर 'जनजागरण आंदोलन' केले. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महागाईबाबत माहिती देणारी पत्रके नागरिकांना व प्रवाशांना वाटली.

मुंबईकरांनी शिवसेना-भाजपला ६ खासदार, ३० आमदार आणि मुंबई महानगरपालिका दिली. त्याच मुंबईकरांवर हा खूप मोठा अन्याय असून ही एकप्रकारे मुंबईकरांची लूट आहे. मुंबईमध्येच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सगळ्यात जास्त आहे. मुंबईमध्ये पेट्रोल ८१ रु. प्रती लिटर आणि डिझेल ६८ रु. प्रती लिटर इतके महाग असून ही मुंबईकरांची छळवणूक असल्याची टीका निरूपम यांनी केली. नीरव मोदीचा घोटाळा हा पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नाकाखाली झाला आहे. नीरव मोदीच्या भ्रष्टाचाराची माहिती २०१६ पर्यंत पंतप्रधान कार्यालयाला होती. जानेवारीमध्ये नरेंद्र मोदींसोबत अनेक उद्योगपती दावोसला गेले होते, त्यात नीरव मोदी सुद्धा सहभागी होता. यावरून असे स्पष्ट होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबत नीरव मोदीचे संबंध आहे, त्यांना त्याच्या आर्थिक भ्रष्टाचाराची माहिती असल्याचा आरोप मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी मोदी सरकारवर केला आहे.

Post Top Ad

test