आगीशी लढण्यासाठी परदेशी टेक्नॉलॉजीचे धडे - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

11 February 2018

आगीशी लढण्यासाठी परदेशी टेक्नॉलॉजीचे धडे


मुंबई । प्रतिनिधी -
मुंबईत नेहमे कोणत्या ना कोणत्या कारणाने आगी लागण्याच्या घटना घडत असतात. आगी लागल्यावर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांना परदेशी टेक्नॉलॉजीचे धडे दिले जाणार आहेत. यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, नवीन संकल्पना, मशीन्स हाताळणे आणि परदेशात आपत्तीकाळात अमलात येणार्‍या आयडिया जवानांना दिल्या जाणार आहेत. येत्या ८ ते १० मार्च दरम्यान मुंबईत ‘लढा ३६०’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाची जोरदार तयारी सुरू असून त्यात जगभरातील १६ टीम सहभागी होणार आहेत अशी माहिती मुंबई अग्निशमन दल प्रमुख प्रभात रहांगदळे यांनी दिली.

मुंबईत आगीच्या घटना वाढल्या असून यामध्ये जीवित आणि वित्तहानी होण्याचे प्रकारही वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेने अग्निसुुरक्षा नसणार्‍या व्यवसाय - आस्थापनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून जवानांनादेखील परदेशी तंत्रज्ञानाचे धडे देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई अग्निशमन दल, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय, गृह विभाग, अग्निशमन सेवा कर्मचारी कल्याण संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात पोतुर्गाल, फ्रांस, ग्रेट ब्रिटन, जर्मनी, पोलंड, ऑस्ट्रिया, स्लोव्हेनिया, झेक प्रजासत्ताक आदी देशांमधील १६ संघ सहभागी होणार आहेत. तसेच आगीचा सामना करण्यासाठी 'लढा ३६०' हा उपक्रम राबवला जाणार आहे. यात आगी लागण्याचे बदलणारी कारणे, प्रकार यांच्याशी सामना करण्याचे प्रशिक्षण यामध्ये दिले जाणार आहे. कुठल्याही बाजूने अथवा कुठल्याही प्रकारची आग लागली तरी तिच्यानियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिकेतील फायर फायटर ट्रेनर मायकल जोसेफ यांच्याकडून सध्या अग्निशमन जवानांना धडे दिले जात आहेत. डायरेक्टर महाराष्ट्र फायर सर्व्हिस ऑफिसर, कलिना येथे हे ट्रेनिंग सुरू आहे. मुंबई फायर फायटरर्स टीम आणि नॅशनल फायर फायटर टीम यामध्ये सहभागी झाल्या असल्याचे प्रभात रहांगदळे यांनी सांगितले.

Post Top Ad

test